घरदेश-विदेशअनेक राज्यांत पेट्रोल-डिझेलची टंचाई, पंपावर लांबच लांब रांगा

अनेक राज्यांत पेट्रोल-डिझेलची टंचाई, पंपावर लांबच लांब रांगा

Subscribe

इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती पसरताच अनेक राज्यातील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, ग्राहकांची हीच गोची लक्षात घेता पेट्रोलिअम कंपन्यांनीही पेट्रोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. तर, दुसरीकडे भारतात गेल्या चार आठवड्यांत इंधन दरांत वाढ झालेली नाही. परिणामी भारतातील इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना अतोनात नुकसान सहन करावं लागत आहे. तर, अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती पसरताच अनेक राज्यातील पेट्रोल पंपावर (Petrol Pump) लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, ग्राहकांची हीच गोची लक्षात घेता पेट्रोलिअम कंपन्यांनीही पेट्रोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. (Shortage of petrol-diesel in many states, long queues at pumps)

हेही वाचा -इंधन २० रुपयांनी स्वस्त होणार; पेट्रोलमध्ये आता इतके टक्के मिसळणार इथेनॉल

- Advertisement -

गेल्या चार आठवड्यांपासून इंधन दरात काहीही बदल झालेला नाहीय, त्यामुळे पेट्रोलिअम कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा होत आहे. त्यामुळे कंपन्यांनी पुरवठा कमी केला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, गुजरातमधील अहमदाबाद आणि राजस्थानमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता हळूहळू देशभरात पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये पेट्रोल (Shortage of Petrol) संपणार असल्याची माहिती पसरली होती. त्यामुळे लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या. तसेच, रिलायन्सने पेट्रोलचे दर ५ रुपयांनी वाढवले तर डिझेलचे दर ३ रुपयांनी वाढवल्याचे अनेक माध्यमांनी म्हटले आहे. या शहरातील पेट्रोल पंपावरील पेट्रोल सध्या संपले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे बिहारमध्ये पुरवठा सुरळीत सुरू आहे. तर, हरियाणा, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये एचपी आणि भारत पेट्रोलिअमच्या पेट्रोल पंपावर टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे इंडियन ऑईलच्या पंपावर दबाव वाढला आहे. इंडियन ऑईलकडे पुरवठा सुरळीत असल्याने येत्या काळात त्यांच्याकडेही टंचाई होण्याची शक्यता आहे.

जयपूरसहित राजस्थानमधील शेकडो पंपावर डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या राज्यात आजपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू लागणार आहे. HPCL आणि BPCL कंपनीने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद केला आहे. अशा स्थितीत राज्यभरातील सुमारे 2500 पेट्रोल पंप बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -