घरदेश-विदेशआपचे नवनिर्वाचीत आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला, एकाचा मृत्यू!

आपचे नवनिर्वाचीत आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला, एकाचा मृत्यू!

Subscribe

आम आदमी पार्टीचे महरौली येथील आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना यादव यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते अशोक मान यांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. नुकताच दिल्ली विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला. या निकालानंतर आमदार नरेश यादव मंदिरात दर्शनाला गेले असता हा प्रकार घडला.

- Advertisement -

 

ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. मला हल्ल्याचे कारण माहिती नाही, परंतू अचानक हा हल्ला करण्यात आला. जवळपास चार राऊंड फायर करण्यात आले. ज्या गाडीवर हल्ला झाला. त्याच गाडीत मी होतो. मला विश्वास आहे जर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला तर हल्लेखोर पकडला जाईल. दिल्ली पोलिसांनी देखील एका मृत्यूच्या वृत्ताबाबत दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

नरेश यादव यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कुसुम खत्री यांचा १८१६१ मतांनी पराभव केला आहे. नरेस यादव यांना ६२४१७ मतं मिळाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -