तिकिटासाठी तब्बल ८० लाख.., आपच्या नेत्यांचं भाजपकडून स्टिंग, व्हिडीओ व्हायरल

भाजपने पुन्हा दिल्ली MCD निवडणुकीआधी एक स्टींग व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये आपवर तिकीट विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा हे वारंवार आपच्या नेत्यांचं स्टिंग समोर आणत आहेत. जे रोहिणीच्या वॉर्ड ५५ डीशी संबंधित आहेत. पात्रा यांनी व्हिडीओ जारी करून बिंदू यांच्याकडून तिकीटासाठी तब्बल ८० लाख मागण्यात आल्याचं म्हटलं आहे.

बिंदू यांनी सर्व पैसे एकत्र देण्यास सांगण्यात आलं. पण त्यांनी पहिला २१ लाख नंतर ४० लाख आणि नंतर २० लाख देईन असं म्हटलं आहे. परंतु पूर्ण पैसे द्यायचे आहेत असं सांगून त्यांना ते नाकारण्यात आलं. याआधी आठ नेत्यांनी पूर्ण पैसे दिले आहेत. यापूर्वी सुद्धा अँटी करप्शन ब्रांचने तिकीट विकल्याच्या आरोपात एका भाजप नेत्याचा मेव्हणा आणि पीएसह तीन लोकांना अटक केली आहे.

आपच्या कार्यकर्त्या शोभा खारी यांनी आपकडे तिकीट मागितलं होतं. आमदार अखिलेश पति त्रिपाठी यांनी तिकीट देण्यासाठी ९० लाख मागितल्याचा आरोप शोभा यांनी केला आहे. तर ३५ लाख रुपये त्रिपाठी आणि २० लाख रुपये वजीपूरच्या राजेश गुप्ता यांना दिले होते. ३५ लाख रुपये तिकीट मिळाल्यानंतर द्यायचे होते. परंतु लिस्ट जारी झाल्यानंतरही शोभा यांचं नाव आलं नसल्याचं म्हटलं आहे. परंतु या स्टिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हेही वाचा : शिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, धोतर फेडण्याचे अनोखे आंदोलन