Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश दगडफेकीच्या घटनांची मालिका सुरूच, हावडामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक आणि जाळपोळ

दगडफेकीच्या घटनांची मालिका सुरूच, हावडामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक आणि जाळपोळ

Subscribe

गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या रामनवमीच्या मिरवणुकीतील दगडफेकीनंतर आता कोतकत्त्यातील हावडा येथे अशीच घटना घडली आहे.

कोलकत्त्यातील हावडा येथे रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीनवर देखील काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. हावडा येथील शिवपुरी येथे संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून ही मिरवणूक काढण्यात आली होती. या घटनेत वाहनांची देखील जाळपोळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरात राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पण देशातील अनेक भागात या उत्साहाला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री (ता. २९ मार्च) छत्रपती संभाजीनगर येथे राम मंदीराच्या समोर दोन गटामध्ये क्षुल्लक कारणावरून राडा झाला. त्यानंतर आज (ता. ३० मार्च) गुजरातमधील वडोदरा आणि कोलकत्त्यामधील हावडा येथे राम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. तर वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील हावडा येथे राम नवमीच्या मिरवणुकीवर करण्यात आलेल्या दगडफेकीबाबत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून आधीच अप्रत्यक्षपणे का असेना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राम नवमीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका या शांततेत काढण्याचे आवाहन केले होते. तर रमजानचा महिना सुरू असल्याने राम नवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका या मुस्लिम बहुल विभागातून काढताना सावधतेने काढाव्यात, असा इशारा देखील ममता बॅनर्जी यांच्याकडून देण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान, पश्चिम बंगाल येथील हावडामध्ये असलेल्या शिवपुरी परिसरात राम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर हल्ला झाल्याने या परिसरात तणावपुर्ण वातावरण तयार झाले आहे. तसेच या घटनेत सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेमुळे आणखी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणी ४००-५०० जणांवर गुन्हा दाखल, एक जण ताब्यात

- Advertisment -