घरदेश-विदेशइस्रोच्या बेबी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण ३ उपग्रहांसह अवकाशात करणार प्रवेश

इस्रोच्या बेबी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण ३ उपग्रहांसह अवकाशात करणार प्रवेश

Subscribe

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सर्वात लहान उपग्रह प्रक्षेपक एसएसएलव्ही-डी २ अर्थात बेबी रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटामधील सतीश धवन लॉन्च सेंटरमधून या प्रक्षेपकाचे शुक्रवारी प्रक्षेपण करण्यात आलेे. एसएसएलव्ही-डी २ हे ईओएस-०७, जानस-१ आणि आझादी सॅट-२ या तीन उपग्रहांसह प्रक्षेपित करण्यात आले. एसएसएलव्ही-डी २ रॉकेटचे पहिले प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते. त्यानंतर या रॉकेटमध्ये अनके बदल करण्यात आले.

यानंतर अखेर रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लहान उपग्रहांना कमी वेळेत आणि कमी खर्चात अवकाशात पाठवता यावे यासाठी इस्रोतर्फे या नव्या लहान रॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे. एसएसएलव्ही-डी २ चे एकूण वजन १७५.२ किलो आहे. हे स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल १० ते ५०० किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

एसएसएलव्ही-डी २ सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल १५ मिनिटांपर्यंत पृथ्वीच्या खालील कक्षेत उड्डाण करेल. या ठिकाणी या उपग्रहांना ४५० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत तैनात केले जाईल. एसएसएलव्ही-डी २ चा उद्देश लहान उपग्रह प्रक्षेपित करणे आहे. सध्याच्या घडीला पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एसएसएलव्ही-डी २ मुळे मोठे प्रक्षेपक मोठ्या मोहिमांसाठी उपलब्ध होईल. एसएसएलव्ही-डी २ हे ५०० किमी अंतरावरील प्लॅनर ऑर्बिटमध्ये १० ते ५०० किलो वजनाची वस्तू वाहून नेऊ शकते.

एसएसएलव्ही-डी २ प्रक्षेपकासोबत जानस-१ हे पेलोड्स आहे. हे एक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर आहे, तर आझादी सॅट २ हे एक स्मार्ट सॅटेलाईट मिशन आहे. हे लॉरा आणि रेडिओ संप्रेषण क्षमता प्रदर्शित करणार आहे. हे भारतातील ७५ शाळांमधील ७५० विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -