ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Gyanvapi Case Varanasi civil judge Plea transferred to fast track court
ज्ञानवापी मशीद प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे वर्ग, नव्या याचिकेवर होणार सुनावणी

ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. ही सुनावणी जिल्हा न्यायालयात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ज्ञानवापी प्रकरणात आज तिसऱ्यांदा सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती वी आय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत, पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

या प्रकरणी अनुभवी न्यायाधिशांनी सुनावणी करावी असे आम्हाला वाटते. सध्या सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांवर आम्हाला काही आक्षेप नाही. परंतु जास्त अनुभवी न्यायाधिशांनी जर हे प्रकरण हाताळले तर याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे. मंदिरात पुजा करण्याप्रकरणी देखील जिल्हा न्यायाधिशांनी लक्ष द्यावे. जिल्हा न्यायाधिश मशिद कमिटीची याचिकेवर देखील निर्णय घेतील की, त्यांचा दावा किती मजबूत आहे. तोपर्यंत शिवलिंग क्षेत्राची सुरक्षा आणि तसेच मुस्लिम बांधवांना नमाज पठण करताना कोणतीही अडचण येणार याची काळजी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यासाठी आठ आठवड्यांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मेच्या आदेशाचे पालन करावे. जिल्हा न्यायाधिश जोपर्यंत या प्रकरणात आदेश देत नाहीत तोपर्यंत न्याधिशांनी वझूकरता पर्यायी व्यवस्था करावी. शिवलिंगाची सुरक्षा करावी आणि नमाज पठण करण्यात कोणतीही बाधा येता कामा नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान उत्तर ते पश्चिमच्या बाजूने चालत गेल्यास मध्यभागी शेषनागासारखी एक कलाकृती दिसून आली. त्याशिवाय या ठिकाणी दिसून आलेल्या अवशेषांनुसार एखाद्या मोठ्या भवनाचे अवशेष असल्याचे दिसून आले असल्याचे अहवालात म्हटले आहे.