Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश पाकिस्तानात पहिल्यांदाच मुख्य न्यायाधीशपदी 'महिला'

पाकिस्तानात पहिल्यांदाच मुख्य न्यायाधीशपदी ‘महिला’

Subscribe

सध्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद नूर मेशकनई आहेत. ते ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर ताहिरा सफ्दार पदभार स्विकारणार आहेत.

पाकिस्ताना महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरण्याची परवानगी नव्हती. पण आता हे चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे. आज पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच न्यायाधीशपदी ‘महिला’ विराजमान झाल्या आहेत. ताहिरा सफ्दार असे या न्यायाधीशाचे नाव आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान हायकोर्टात त्यांची वर्णी लागली आहे. पाकिस्तानातील हा निर्णय ऐतिहासिक असून न्यायाधीश मिआन साकीब निसार यांनी त्यांची निवड केल्याची माहिती पीटीआयकडून देण्यात आली आहे.

मेशकनई ३१ ऑगस्टला होणार निवृत्त

सध्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद नूर मेशकनई आहेत. ते ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर ताहिरा सफ्दार पदभार स्विकारणार आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी, ‘ताहिरा सफ्दार बलुचिस्तान हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश होणार’, असे सांगितले होते.

तीन खंडपीठाच्या असणार प्रमुख

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे ताहिरा या बलुचिस्तान कोर्टातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या प्रमुख असतील. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्ऱफ यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपाखालील सुनावणी सध्या सुरु आहे. त्या कोर्टाचा देखील यामध्ये समावेश आहे.

कोण आहे सैयदा ताहिरा सफ्दार ?

जस्टिस ताहिरा सफ्दार (६१) या पाकिस्तानातील प्रसिद्ध वकील सैय्यद इम्तियाज हुसैन बाकरी हनाफी यांची मुलगी आहे. त्यांचा जन्म क्वेटामध्ये ५ ऑक्टोबर १९५७ रोजी झाला. क्वेटामध्येच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. १९८०मध्ये त्यांनी क्वेटा मधल्या युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून लॉचे शिक्षण घेतले. १९८२ साली बलुचिस्तान कोर्टात महिला सिविल जज म्हणून सैयदा ताहिरा सफ्दार यांची नियुक्ती झाली. त्यावेळी देखील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नावारुपाला आल्या आणि आता बलुचिस्तान हायकोर्टातील मुख्य न्यायाधीश म्हणून त्या नियुक्त झाल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -