घरताज्या घडामोडीतालिबानची अमेरिकेला धमकी, ३१ ऑगस्टपर्यंत सैन्या मागे घ्या, अन्यथा...

तालिबानची अमेरिकेला धमकी, ३१ ऑगस्टपर्यंत सैन्या मागे घ्या, अन्यथा…

Subscribe

३१ ऑगस्टनंतर एक दिवसाचा वेळ देखील तालिबान अमेरिकी सैन्याला देणार नाही, सैनिकांना मागे घेण्यासाठी आणखी वेळ मागतिला तर त्याचे उत्तर नाही  असे असेल.

अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) सध्या अमेरिकी सैन्य तैनात करण्यात आले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानध्ये राहणार असून गरज पडल्यास ३१ ऑगस्टनंतर देखील सैन्य तिथे थांबू शकते. याच पार्श्वभूमीवर तालिबानकडून अमेरिकेला धमकी देण्यात आली आहे. तालिबानने (Taliban) म्हटले आहे की, ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकेने सैन्य मागे घ्यावे अन्यथा गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल,असे म्हटले आहे. (Taliban warn america, take back their troops by August 31)  अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्य ११ सप्टेंबर रोजी मागे घेण्याचे ठरवले होते मात्र तारिख वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली.

तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी म्हटले आहे की, ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकी सैन्य मागे घेतले जाईल, असे अमेरिकेच्या राष्ट्रपतींने म्हटले आहे. त्यानुसार त्यांना त्यांचा शब्द पूर्ण करावा लागेल. ३१ ऑगस्टनंतर एक दिवसाचा वेळ देखील तालिबान अमेरिकी सैन्याला देणार नाही, सैनिकांना मागे घेण्यासाठी आणखी वेळ मागतिला तर त्याचे उत्तर नाही  असे असेल. त्याचप्रमाणे या देशाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,अशी धमकी तालिबानकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान काही शांत बसलेला नाही. अफगाणिस्तानमधील अनेक ठिकाणी तालिबानने कब्जा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने बगलानमधील तीन जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे. तर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी बगलान प्रांतातील पुल-ए-हिसाल,बन्नू,देह सालेह जिल्ह्यांना शत्रूंच्या ताब्यातून आझाद केल्याचा दावा केला आहे.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी अमेरिकी सैन्य भारताला मोठी मदत करत आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय काबूल विमानतळावर जमा होत असून त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी दररोज भारताच्या दोन विमानांच्या उड्डाणांना अमेरिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत अफगाणिस्तानमधून २०० हून अधिक भारतीयांना सुखरुप भारतात आणण्यात आले आहे. अद्याप अफगाणिस्तानमध्ये ३५० हून अधिक भारतीय नागरिक अडकले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकन एअरफोर्सच्या विमानात अफगाणी महिलेने दिला बाळाला जन्म

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -