घरअर्थजगतTech Layoff 2023 : गुगल इंडियाचे ४०० हून अधिक कर्मचारी बडतर्फ

Tech Layoff 2023 : गुगल इंडियाचे ४०० हून अधिक कर्मचारी बडतर्फ

Subscribe

Tech Layoff 2023 | गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांनी कर्मचाऱ्यांना मेल बडतर्फ केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात Alphabet Inc ने १२०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.

Tech Layoff 2023 | जगभरात मंदीचे (Recession) सावट असल्याने विविध क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात (Layoff) करण्यात येत आहे. त्यातच आता गुगल इंडियाने (Google India) विविध विभागांतील ४५३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची माहिती मेलद्वारे देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही बडतर्फीची कारवाई करण्यात आले सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – ‘यूट्युब’ची कमान आता भारतीयाच्या हाती; वाचा कोण आहेत यूट्युबचे नवे सीईओ

- Advertisement -

गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांनी कर्मचाऱ्यांना मेल बडतर्फ केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात Alphabet Inc ने १२०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. तसंच, जगभरातून एकूण सहा टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता ज्या ४५३ कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय ते १२०० पैकी आहेत की कर्मचारी कपातीची दुसरी फेरी सुरू झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, गुगल इंडियाने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला असला तरीही त्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत. स्थानिक कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवणार असल्याचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. तसंच, याआधी काढून टाकलेल्या १२०० कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी गुगलने उचलली होती. गुगलने जगभरातून कर्मचारी कपात केली आहे, त्यामुळे एकूण किती कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

- Advertisement -

हेही वाचा – झोमॅटोने २२५ शहरांतून व्यवसाय गुंडाळला, काय आहे कारण?

कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर देशभरातील लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात आला होता. मात्र, याच काळात सर्वाधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ऑगस्ट २०२२ पर्यंत कर्मचारी सुरक्षित होते. मात्र, त्यानंतर, नोकर कपात वाढत गेली. आयटी क्षेत्रात सर्वाधिक कपात झाली असून टेक क्षेत्रातही कपातीला सुरुवात झाली आहे. Amazon ने 18,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचे जाहीर केले होते. मेटाने 13,000 कर्मचार्‍यांना नारळ दिला आहे. तसंच, भारतात स्विगी, झोमॅटो, शेअर चॅटसारख्या कंपन्यांनीही निष्क्रिय कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -