घरदेश-विदेशफ्रेंच लेखिका अॅनी अर्नोक्स यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

फ्रेंच लेखिका अॅनी अर्नोक्स यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

Subscribe

फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांचा जन्म १९४० मध्ये झाला. नॉर्मंडीमधील यवेटोटमध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या आई-वडिलांचं किराण्याचं दुकान आणि कॅफे होते. ग्रामीण भागातून आल्याने त्यांच्या लिखाणात सातत्त्याने ग्रामीण बाज दिसतो.

नवी दिल्ली – सोमवारपासून विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. आज साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. फ्रेंच लेखिका अॅनी अर्नोक्स यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. साहित्यातून सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एक सुवर्ण पदक, 8.20 कोटी रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अॅनी अर्नोक्स यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक विषमता आणि राजकारणावर भाष्य केलं आहे. सातत्याने विविध मार्गाने लिंग, भाषा आणि वर्गांवर आपल्या लेखणीतून बाण सोडले आहेत. त्यांनी 1974 मध्ये पहिल्यांदा Les Armoires vides (Cleaned Out) हे आत्मचरित्रपर कांदबरी लिहिली. तेव्हापासून त्यांच्या लेखणीला सुरुवात झाली.

- Advertisement -


फ्रेंच लेखिका अॅनी अर्नोक्स यांचा जन्म १९४० मध्ये झाला. नॉर्मंडीमधील यवेटोटमध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या आई-वडिलांचं किराण्याचं दुकान आणि कॅफे होते. ग्रामीण भागातून आल्याने त्यांच्या लिखाणात सातत्त्याने ग्रामीण बाज दिसतो.

हेही वाचा – भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, तीन वैज्ञानिकांना मिळाला संयुक्त सन्मान

- Advertisement -

गेल्यावर्षी ब्रिटनमधील लेखक अब्दुलराझक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. व्यक्ती आणि समाजाच्या स्थलांतरावर त्यांनी प्रभावी भाष्य केल्याने त्यांना पुरस्कार मिळाला होता.

नोबेल पुरस्कार द्यायला १९०१ सालापासून सुरुवात झाली. मात्र, १९४३ आणि २०१८ या दोन सालांत नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही. १९४३ साली दुसऱ्या महायुद्धामुळे पुरस्कार सोहळा स्थगित करावा लागला होता. तर, २०१८ मध्ये स्वीडिश अकादमीच्या सदस्या कॅटरिना यांचे पती आणि फ्रेंच फोटोग्राफर जेन क्लोड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता, त्यामुळे पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार १० ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -