घरदेश-विदेशजगातला या वर्षातील सर्वात मोठा नरसंहार; नायजेरियात ११० नागरिकांची गळा चिरुन हत्या

जगातला या वर्षातील सर्वात मोठा नरसंहार; नायजेरियात ११० नागरिकांची गळा चिरुन हत्या

Subscribe

जगातील यावर्षातील सर्वात मोठा नरसंहार नायजेरीयात घडला आहे. नायजेरियाच्या एका गावात बोकोहराम या दहशतवादी संघटनेने तब्बल ११० शेतकऱ्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नायजेरियातील संयुक्त राष्ट्राचे समन्वयक एडवर्ड कोलन यांनी या घटनेची माहिती दिली. या वर्षातील सर्वात मोठा हिंसक हल्ला असल्याचे संयुक्त राष्ट्राचे समन्वयक एडवर्ड कोलन यांनी सांगितले.

बोकोहराम या दहशतवादी संघटनेने तब्बल ११० शेतकऱ्यांची निर्घृणपणे हत्या केली. तर अनेकजण जखमी झाले आहेत. सुरुवातीला मृतांची संख्या ४३ आणि नंतर ७० सांगण्यात आली. मात्र, आता ही संख्या ११० पर्यंत पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांनी या गावातील महिलांचे अपहरण केल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

शेतकरी शेतांमध्ये काम करत असताना गाड्यांमधून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात जवळपास ११० नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, मागील वर्षभरात बोकोहरामकडून या भागात अनेकदा असे हल्ले झाले आहेत. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी देखील बोकोहराम संघटनेवर आरोप केले आहेत. दरम्यान, नायजेरियाचे अध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी घटनेचा निषेध केला आहे. “बॉर्नो राज्यात दहशतवाद्यांकडून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. या निर्घृण हत्येने संपूर्ण देशाला धक्का बसलाय,” असे मोहम्मद बुहारी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -