घरताज्या घडामोडी'आम्ही आमदारांच्या संपर्कात', भाजपच्या भूमिकेवर पटवारींचा पलटवार

‘आम्ही आमदारांच्या संपर्कात’, भाजपच्या भूमिकेवर पटवारींचा पलटवार

Subscribe

भाजपने मध्यप्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस सुरू केले असल्याने आता मुख्यमंत्री कमलनाथ सरकार अडचणीत येणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मंगळवारी रात्री उशीरा काँग्रेसचे दोन मंत्री जयवर्धन सिंह आणि जीतू पटवारी गुरूग्राम हॉटेलमध्ये पोहचले. 

मध्यप्रदेशात मंगळवारी रात्रीपासून राजकीय खलबत सुरू असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी काँग्रेसने आपल्या आठ आमदारांना गुरूग्राम हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप भाजपवर केला आहे. त्यामुळे भाजपने मध्यप्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस सुरू केले असल्याने आता मुख्यमंत्री कमलनाथ सरकार अडचणीत येणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मंगळवारी रात्री उशीरा काँग्रेसचे दोन मंत्री जयवर्धन सिंह आणि जीतू पटवारी गुरूग्राम हॉटेलमध्ये पोहचले.

सत्ता मिळवण्यासाठी ऑपरेशन कमळ?

पटवारी यांनी म्हटले की, ‘दिग्विजय सिंह सध्या हॉटेल बाहेर असून पोलिस त्यांना सोडत नाही आहेत’, अशी माहिती देखील त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिली आहे. यासोबतच त्यांनी भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा आणि माजी गृहमंत्री भूपेंद्र सिंह आमदारांना पैशांचं आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप केला आहे. “शिवराज सिंह चौहान यांना सत्तेची हाव आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारे ते प्रयत्न करत आहेत. असे असले तरीही आम्ही त्यांना यात यशस्वी होऊ देणार नाही, आम्ही हॉटेलवर असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहोत”, असे देखील पटवारी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

आमदारांची दिल्लीला रवानगी?

मंगळवारी वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून काँग्रेस, समाजवादी, बसपाच्या आमदारांना दिल्लीला नेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आमदार रमाबाई परिहार चार्टर्ड विमानानं दिल्लीला गेल्याचे देखील ट्विट त्यांनी केले आहे. मात्र रमाबाईंनी आपण कमलनाथ सरकार सोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांनी नुकताच भाजपवर सरकार अस्थिर करत असल्याचा आरोप केला होता. याआधी देखील भाजपने कर्नाटकात अशाच प्रकारे ऑपरेशन लोटसची मोहीम चालवली होती आणि सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. हॉटेलमध्ये असलेले सर्व आमदार काँग्रेसचे असल्याचे पटवारी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -