घरदेश-विदेशवयवर्ष १०० असणाऱ्या वयोवृद्धाने ४५ दिवसांनी केली कोरोनावर मात!

वयवर्ष १०० असणाऱ्या वयोवृद्धाने ४५ दिवसांनी केली कोरोनावर मात!

Subscribe

देशातील सर्वात वयोवृद्धाने ४५ दिवसांच्या लढाईनंतर कोरोनाला हरवलं

देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र अशा परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे कोरोना या जीवघेण्या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या यादीत जास्तीत जास्त रूग्ण हे ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील असल्याचे समोर आले आहे.

देशातील सर्वात वयोवृद्धाने कोरोनाला हरवलं

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल झालेल्या १०० वर्षांच्या मोहम्मद शरीफ यांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना महामारीच्या आजाराने बरे झालेल्या वृद्ध रूग्णांपैकी शरीफ हे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. तर शरीफ यांना ५ जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी धैर्य आणि सकारात्मक विचार आवश्यक आहे, याला माझे वडील पुरावा असून त्यांना ४५ दिवस दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात राहिल्यानंतर ५ जूनला डिस्चार्ज मिळाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर वडिलांना सुरुवातीच्या दिवसांत बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागल्याचे वयोवृद्ध व्यक्तीचा मुलगा अलिमुद्दीन यांनी सांगितले.

वयोवृद्धाच्या धाडसाला सलाम

यमुनेच्या पलीकडे राहणारे शरीफ पूर्णपणे बरे झाले असून शरीफ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४५ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा त्यांची प्रकृती खूपच वाईट होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यावेळी त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांची टीम सतत काळजी घेत होते.


अखेर दिल्ली सरकारची कबुली, कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -