जगातील ‘या’ सर्वात आनंदी देशात विदेशी प्रवाशांना मिळतेय नोकरीसह राहण्याची सुवर्ण संधी

the worlds happiest country is giving a golden opportunity to migrants to settle in their country
जगातील 'या' सर्वात आनंदी देशात विदेशी प्रवाशांना मिळतेय नोकरीसह राहण्याची सुवर्ण संधी

जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड अन्य देशांतील प्रवाशांना आपल्या देशात राहण्याची सुवर्ण संधी देता आहे. त्यामुळे कोरोना काळात जगातील सुंदर देश फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होऊ शकते. फिनलँड या देशाला सध्या कामगारांच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे इतर देशांमधील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिनलँड देशाचे जीवनमान इतर देशांपेक्षा बरेच उत्कृष्ट आणि चांगल्याप्रतीचे आहे.

फिनलँडहून इतर देशांत स्थलांतर करण्याची गोष्ट तर दूरचं पण या देशात आता कामगारांची मोठी कमतरता जाणवत आहे. टॅलेंटेड सोल्यूशन्स एजन्सीचे रिक्रूटर साकू थिवरैंनेन सांगतात की, आम्हाला मोठ्या प्रमाणात लोकांची गरज आहे हे खरे आहे. कारण या देशात वृद्ध होणाऱ्या नागरिकांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे तरुण कामगारांची संख्या खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत इतर देशांतील कुशल कामगारांची गरज भासू लागली आहे.

the worlds happiest country is giving a golden opportunity to migrants to settle in their country
जगातील ‘या’ सर्वात आनंदी देशात विदेशी प्रवाशांना मिळतेय नोकरीसह राहण्याची सुवर्ण संधी

रिक्रुटर एजन्सीने सांगितले की, वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि तरुणांचे विलासीपूर्ण जीवन पाहता कामगारांची मोठी गरज आहे. घटत्या लोकसंख्येमुळे जगातील अनेक पाश्चात्य देशांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. फिनलँडसारख्या देशामध्येही जन्मदरात घट होत असल्याने तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या वाढत आहे. फिनलँडमधील ४० टक्के लोकसंख्येचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. जपाननंतर सर्वाधिक वृद्धांची संख्या फिनलँड देशात आहे. २०३० पर्यंत फिनलँडमधील वृद्धांची संख्या ४७.२ टक्क्यांपर्यंत पोहचू शकते.

५५ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात दरवर्षी २० ते ३० हजार लोकांची सार्वजनिक सेवेत काम करण्यासाठी त्वरित गरज भासत असल्याचे सरकारने म्हटले आहे. ज्यामुळे वृद्धांच्या काळजीपासून ते आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकतात. फिनलँडचे जीवन गुणवत्ता, स्वातंत्र्य आणि लिंग समानता उच्च स्तरावरील आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि लोकसंख्येत खालच्या स्तरावर आहे. परंतु स्थलांतरितांबद्दल कठोर धोरण आणि बाहेरील लोकांना नोकरी न देण्याची परंपरा या देशात असल्याने अनेक अडचणी येत आहेत.


जगातील ‘या’ सर्वात आनंदी देशात विदेशी प्रवाशांना मिळतेय नोकरीसह राहण्याची सुवर्ण संधी