घरदेश-विदेशTheatre Command System : लष्कराच्या मदतीसाठी हवाई दलाने पोहोचवली सामग्री

Theatre Command System : लष्कराच्या मदतीसाठी हवाई दलाने पोहोचवली सामग्री

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) एएन-32 (AN-32) विमानाने यांत्रिकी दलासाठी युद्धसामग्री यशस्वीरित्या जमिनीवर उतरवली. एखाद्या युद्धादरम्यान लष्कराला अशा प्रकारे हवाई दलाकडून मोठी मदत पोहोचविणे शक्य होणार आहे.

लष्कराच्या ऩॉर्दन कमांडने (Northern Command) ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ध्रुव कमांडच्या एअर मेंटेनन्स टीमने एएन-32 विमानातून युद्धसामग्री यशस्वीपणे पॅराशूटच्या माध्यमातून जमिनीवर उतरविण्यात आला. पश्चिम सीमेवर तैनात असलेल्या यांत्रिकी दलासाठी ही सामग्री विमानातून उतरवण्यात आली. या यशाने थिएटर कमांड स्थापन करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे, असे ऩॉर्दन कमांडने या ट्वीटमध्ये म्हटले आहे. हवाई दलाच्या या यशामुळे आपले सैन्य थिएटर कमांड (Theatre Command System) स्थापन करण्याच्या जवळ आले आहे. माजी सीडीएस जनरल दिवंगत बिपिन रावत यांनी थिएटर कमांडच्या स्थापनेची सुरुवात केली होती आणि आता माजी सीडीएसचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

- Advertisement -

काय आहे थिएटर कमांड?

देशाच्या संरक्षण दलाच्या लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या या तीन शाखांमध्ये थिएटर कमांडच्या अंतर्गत एकसंधता तयार केली जाईल. संरक्षण क्षेत्रातील हा देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. यामुळे एकात्मिक शक्ती तयार होऊन भारतीय सैन्याची लढाऊ परिणामकारकता वाढेल. या अंतर्गत आपल्या सैन्याचे तिन्ही भाग एकत्रितपणे काम करतील.

- Advertisement -

माजी सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी थिएटर कमांडसाठी पुढाकार घेतला होता. पण 2022मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकल्पावर थोडा परिणाम झाला असला तरी आता पुन्हा यावर वेगाने काम सुरू झाले आहे. पाकिस्तान आणि चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर थिएटर कमांड स्थापन करण्याची मागणी प्रलंबित होती. यासोबतच लष्कराच्या तिन्ही दलांमधील समन्वयाचा अभावही दूर करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -