Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश हा तर चमत्कारच..., आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर केजरीवालांची प्रतिक्रिया

हा तर चमत्कारच…, आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर केजरीवालांची प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या डिसेंबर महिन्यात गुजरात निवडणुकीत पाच जागा जिंकण्याबरोबरच मिळवलेल्या टक्केवारीमुळे आम आदमी पार्टीला (AAP) आज, सोमवारी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आपचे प्रमुख आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद करकेजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आणि हा एक चमत्कारच असल्याची भावना व्यक्त केली.

राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंद होण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission of India) काही निकष आहेत. पहिला निकष म्हणजे त्या पक्षाचे लोकसभेत चार सदस्य असावेत. लोकसभा निवडणुकीत त्याला 6 टक्के मते मिळायला हवीत. तसेच चार राज्यांतील निवडणुकीत त्या पक्षाला 6 टक्क्यांहून अधिक मते मिळायला हवीत. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. दिल्ली महापालिकाही आपने काबिज केली आहे. गोवा निवडणुकीत आपला दोन जागा मिळाल्या व तेथे त्यांना 6.77 टक्के मते मिळाली. गुजरात निवडणुकीत पाच जागा जिंकणाऱ्या आपला 13 टक्के मते मिळाली. त्यामुळे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी त्यावेळी गुजरातच्या जनतेचे आभार मानले होते.

- Advertisement -

या सर्व निकषांवर आम आदमी पार्टीला सोमवारी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट करून आनंद व्यक्त केला. इतक्या कमी वेळात राष्ट्रीय पक्ष? हे चमत्कारापेक्षा कमी नाही. देशातील कोट्यवधी जनतेने आम्हाला येथपर्यंत आणून पोहोचवले आहे. लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांनी आज आमच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपविली आहे. हे प्रभू, ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडू असा आशीर्वाद आम्हाला द्या, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे.

- Advertisment -