घरताज्या घडामोडी'उत्साहामध्ये या, शिस्तीने या...'; दसरा मेळाव्याच्या परवानगीनंतर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

‘उत्साहामध्ये या, शिस्तीने या…’; दसरा मेळाव्याच्या परवानगीनंतर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Subscribe

'उत्साहामध्ये या, वाजत-गाजत या, शिस्तीने या कुठेही आपल्या तेजस्वी परंपरेला गाळबोट लागेल असे कृत्य करू नका', असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याबाबत झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेला परवानगी दिली.

‘उत्साहामध्ये या, वाजत-गाजत या, शिस्तीने या कुठेही आपल्या तेजस्वी परंपरेला गाळबोट लागेल असे कृत्य करू नका’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याबाबत झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेला परवानगी दिली. मात्र, ही परवानगी देण्यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबात शिवसेनेच्या वकिलांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी ‘आम्ही असे कोणतेच कृत्य करणार नाही’, असे आश्वासन न्यायालयाला दिले. (Shiv sena uddhav thackeray shivaji park dasara melava mumbai high court)

मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर मुंबईसह राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी “गेल्या 66 सालापासून विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो. या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबतच्या केसमध्ये शिवसेनेला विजय मिळाला आहे. आमचा न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच, “न्यायदेवेतेने आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, त्याबाबत शिवसैनिकांना मी आवाहन करतो की, त्यांनी उत्साहामध्ये या, वाजत-गाजत या, शिस्तीने या कुठेही आपल्या तेजस्वी परंपरेला गाळबोट लागेल असे कृत्य करू नका”, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

“आपल्या तेजाच्या वारश्याला गालबोट लागेल, असे होऊ देऊ नका. कारण इतर काय करतील, त्यांची मला कल्पना नाही. पण आपली परंपरा आहे. आपल आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्ये प्रतिनिधीत्व करत आहोत. या दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्रातच नवे तर, देशासह जगभरातील बांधव याकडे पाहत आहेत. आजच्या न्यायालयाच्या निकालाकडेही त्यांचे लक्ष होते”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“आमची शिवसेना वाढलेली आहे. परवा आमचा मुंबईतील शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा होता, त्यावेळी बरेचजण तिथे उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी न्यायालयाने राज्य सरकारवर टाकलेली आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारसुद्धा याला जबाबदार राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांचे योग्य काम करेल”, असे उद्धव ठाकरे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा; आदित्य ठाकरेंना भाजपाचे आव्हान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -