घरदेश-विदेशबरमुडा, शॉट्स, हाफ पँट घालून वाहन चालविल्यास चौपट दंड

बरमुडा, शॉट्स, हाफ पँट घालून वाहन चालविल्यास चौपट दंड

Subscribe

आता जर बरमुडा, शॉट्स, हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालवल्यास नव्या वाहतूक नियमावलीनुसार चौपट दंड आकारण्यात येणार आहे.

वाहतुकीचे नियम बदलून नवे नियम लागू करण्यासाठीच्या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. त्यानुसार आता वाहतूक नियम तोडल्यास नव्या दरांनुसार बसणारा दंड हा जास्त आहे. त्यामुळे आता वाहतुदार नियमांचे पालन करत आहेत. परंतु, आता जर बरमुडा, शॉट्स, हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालवल्यास नव्या वाहतूक नियमावलीनुसार चौपट दंड आकारण्यात येणार आहे. आता वाहन चालवणाऱ्यांसाठी विशेष ड्रेसकोड लागू होणार आहे. मात्र, हा नियम महाराष्ट्रात नसून उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आला आहे.

या वाहन चालकांना आकारण्यात येणार दंड

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आता बरमुडा, शॉट्स, हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालवल्यास नव्या वाहतूक नियमावलीनुसार २ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. लखनऊच्या वाहतूक खात्याकडून हा नियम जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अवजड किंवा चारचाकी वाहने चालवणाऱ्यांना या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच नियमांप्रमाणे ड्रेसकोट नसेल तर वाहतूक नियमांनुसार दंड आकारला जाणार आहे.

- Advertisement -

असा असणार ड्रेस कोट

नव्या वाहतूक नियमानुसार अवजड वाहने चालवणाऱ्यांसाठी पँट, शर्ट आणि बुट घालणे आवश्यक आहे. त्यामुळे या ड्रेसव्यतिक्त इतर कपडे घातल्यास दंड आकारला जाणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. देशात नवी वाहतूक नियमावली लागू झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात निषेध व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर देखील विविध प्रकारे मते नोंदवण्यात येत आहेत. सर्व स्तरातून या नियमावलीविरोधात नाराजी व्यक्त होत असताना त्यातच आता लखनौमध्ये वाहनचालकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याने या नियमावरुन वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.


हेही वाचा – वाहतुकीचे नियम तोडल्यास आता बसणार जास्त भुर्दंड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -