घरदेश-विदेश'सत्य हेच माझे शस्त्र, सत्य हाच आधार'; सूरत न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर राहुल...

‘सत्य हेच माझे शस्त्र, सत्य हाच आधार’; सूरत न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्लीः सत्य हेच माझे शस्त्र आहे. सत्य हाच माझा आधार आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयात अपील याचिका दाखल केल्यानंतर दिली. ट्वीट करुन राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

माझी लढाई मित्रकाल विरोधात आणि लोकशाही टिकवण्यासाठी सुरु आहे. या लढाईत सत्य हेच माझे शस्त्र आहे आणि सत्य हाच माझा आधार आहे, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. तर कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही ट्वीट करुन राहुल गांधी यांना समर्थन दिले आहे. यौद्धे विचलीत होत नाहीत. संयम सोडत नाहीत. अडचणींना मिठी मारतात. काट्यातून मार्ग काढतात, असे ट्वीट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

- Advertisement -

मोदी आडनावाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सुरत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी सोमवारी सुरत सत्र न्यायालयात अपील याचिका दाखल केली. या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी अपील याचिकेत केली आहे. याची नोंद करुन घेत न्यायालयाने यातील तक्रारदार पूर्णेश मोदी यांना नोटीस जारी केली. या मागणीचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पूर्णेश मोदी यांना दिले. तसेच राहुल गांधी यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मंजूर केलेला जामीनही सत्र न्यायालयाने कायम ठेवला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी हे कर्नाटकातील कोलारमध्ये म्हणाले होते की, “सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत?” राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिमेतील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण सुरतच्या न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात राहुल गांधी यांना याआधी 9 जुलै 2020 रोजी सुरत न्यायालयात हजर राहावे लागले होते. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -