घरदेश-विदेशकाबूलमध्ये रशिया दूतावासाजवळ आत्मघाती हल्ला, २० जण ठार; हल्लेखोरांचा खात्मा

काबूलमध्ये रशिया दूतावासाजवळ आत्मघाती हल्ला, २० जण ठार; हल्लेखोरांचा खात्मा

Subscribe

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रशियाच्या दुतावासाजवळ आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. दुतावासाच्या प्रवेशद्वारादवळ झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मृतांमध्ये रशियातील दोन नेत्यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जातंय.

हा हल्ला होताच सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा खात्मा केला आहे. हल्लेखोर दुतावासाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचण्याआधीच सुरक्षारक्षांनी हल्लेखोरांवर हल्ला करून त्यांचा खात्मा केला. रशियाच्या दुतावासाबाहेर असलेल्या तालिबानी सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांना आधीच ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी तत्खाल गोळी मारली. हल्लेखोरांना गोळी लागताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात तब्बल २० जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -