Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश अबब! अंटार्क्टिकावरून ओढून आणणार हिमनग

अबब! अंटार्क्टिकावरून ओढून आणणार हिमनग

पाण्यासाठी अंटार्क्टिकामधून हिमनग ओढून आणणार असल्याचं ऐकलं आहे का तुम्ही कधी? आश्चर्य वाटलं ना? अशीच एक बातमी आहे

Related Story

- Advertisement -

पाणी हा सर्वच देशात लोकांना भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. आतापर्यंत पाण्यासाठी करण्यात येणारे खूप प्रयत्न तुम्ही ऐकले असतील ना? पण पाण्यासाठी अंटार्क्टिकामधून हिमनग ओढून आणणार असल्याचं ऐकलं आहे का तुम्ही कधी? आश्चर्य वाटलं ना? अशीच एक बातमी आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. यावर उपाय म्हणून या देशानं चक्क अंटार्क्टिका अर्थात दक्षिण ध्रुवावरून एक मोठा हिमनगच खेचून आणण्याची योजना आखली आहे.

काय आहे सरकारची योजना?

गोड्या पाण्याचा मोठा साठा असणारा हिमनग आपली पाण्याची गरज भागवू शकेल असं संयुक्त अरब अमिरातच्या सरकारला वाटत आहे. त्यामुळं हा हिमनग ओढून आणण्याची योजना करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ही योजना नक्कीच कठीण असून युएईच्या नॅशनल अॅडव्हायझर ब्युरोनं याबाबत नुकतीच घोषणा केली. या युएई – आईसबर्ग प्रोजेक्टबाबत लोकांना नक्कीच कुतूहल आहे. हिमनग ही कार नक्कीच नाही. कारप्रमाणे हिमनग कसा काय ओढून नेणार? हा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडला असणार. ‘खलीज टाइम्स’नं दिलेल्या अहवालानुसार, या हिमनगामधूनच दुबई आणि इतर शहरांना पाणीपुरवठा करण्याची ही योजना आहे. ही योजना साकार होण्यासाठी, एक पथक तयार करण्यात आलं असून साधारण ६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे. तर, पुढील वर्षाच्या मध्यावर या योजनेवर काम सुरु होण्याची शक्यता आहे. दक्षिण ध्रुव अर्थात अंटार्क्टिकामधील एखादा हिमनग ऑस्ट्रेलियाच्या पर्थ अथवा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये खेचून आणण्यात येणार असून जहाजामधून २०२० च्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणण्याची ही योजना असल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -