घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: युक्रेनने महिला-मुलांना देश सोडण्याची दिली परवानगी, पण पुरुषांना युद्धासाठी थांबवले

Russia-Ukraine War: युक्रेनने महिला-मुलांना देश सोडण्याची दिली परवानगी, पण पुरुषांना युद्धासाठी थांबवले

Subscribe

रशियाकडून सलग तिसऱ्या दिवशी युक्रेनवर हल्ला सुरू आहे. राजधानी कीववर सतत हल्ल्या होत असल्यामुळे सुरक्षित ठिकाण शोधत युक्रेनचे हजारो लोकं सीमा पार करून पश्चिमकडील शेजारी देशांपर्यंत पोहोचले आहेत. शेजारील देशांमध्ये आश्रय घेणाऱ्यांमध्ये जास्त करून महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेंस्की यांनी आदेश दिला आहे की, ‘देशातील जे नागरिक सैन्यात सामिल होण्यास पात्र आहेत, त्यांनी देश सोडून जाऊ नका.’

देश सोडून जाणाऱ्या पुरुषांना ट्रेनमधून उतरवले जातेय 

कीवमधून पॉलंडच्या प्रेजेमिस्लमध्ये पोहोचलेल्या महिला डारियाने रडत सांगितले की, ‘ट्रेनमधून पुरुषांना खेचून खाली उतरवले जात आहे. जे आपल्या मुलांसोबत प्रवास करत आहेत, त्या पुरुषांना देखील ट्रेनमधून उतरवले जात आहे.’

- Advertisement -

६८ वर्षीय महिला विल्मा शुगर युक्रेनच्या उजहोरोडहून आपल्या ४७ वर्षीय मुलासोबत हंगरीमध्ये आश्रय घेण्यास जात होत्या. परंतु त्यांच्या मुलाला ट्रेनमधून उतरवले. विल्मा शुगर यांनी सांगितले की, ‘त्या आता हंगरीच्या जाहोनीमध्ये पोहोचल्या आहेत.’ तसेच दुसऱ्या महिलेने सांगितले की, ‘युक्रेनचे अधिकारी लोकांसोबत खूप सभ्येत वागत आहेत. ते पुरुषांना सांगत आहे की, त्यांचे पहले कर्तव्य देशाचे रक्षण आहे.’

मोठ्या शहरातून ग्रामीण भागात जातायत लोकं

रशियाच्या युक्रेन हल्ल्यानंतर कीव सारख्या मोठ्या शहरातून लोकं ग्रामीण भाग पळून जात आहेत. युक्रेनच्या मारियोपोलहून लोकं ट्रेनद्वारे कीवकडे रवाना झाले होते. पण ते कीवमध्ये गेले नसून रस्त्यात असलेल्या छोट्या स्टेशनमध्ये उतरले. या लोकांचे म्हणणे आहे की, ‘रशियन सैन्य सर्वसामान्य जनतेवर हल्ला करणार नाही.’

- Advertisement -

१ लाखांहून लोकांनी सोडला युक्रेन

संयुक्त राष्ट्रातील निर्वासित समस्यांचे उच्चायुक्त फिलिपो ग्रांडी म्हणाले की, ‘गेल्या ४८ तासांमध्ये युक्रेनचे ५० हजारांहून अधिक नागरिक शरणार्थी होऊन दुसऱ्या देशांमध्ये पोहोचले आहेत. आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी देश सोडला आहे. यामधील जास्तीत जास्त लोक पॉलंड आणि मोल्दोवात पोहोचले आहेत. अजूनही लोकं देश सोडून जात आहेत. जर युद्धाची परिस्थिती अशी कायम राहिली तर लवकरच हा आकडा वाढून ४० लाखांपर्यंत पोहोचू शकतो.’


हेही वाचा – Russia Ukraine Crisis: युक्रेन हल्ला निषेध प्रस्तावावर भारत तटस्थ, चीनचा सावध पवित्रा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -