घरदेश-विदेशडोक्याला बॉल लागून पंचाचा मृत्यू

डोक्याला बॉल लागून पंचाचा मृत्यू

Subscribe

क्रिकेट सामन्या दरम्यान डोक्याला बॉल लागून पेम्ब्रॉकशायर क्रिकेट क्लबचे पंच जॉन विल्यम्सने यांचे निधन झाले आहे.

डोक्याला बॉल लागल्यामुळे पेम्ब्रॉकशायर क्रिकेट क्लबचे पंच जॉन विल्यम्स यांचे निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. पेम्ब्रॉकशायर क्रिकेट क्लबने यासंदर्भात ट्विटर माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात पेमब्रोक आणि नेरबर्थ यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यात विल्यम्स यांच्या डोक्यावर बॉल लागला. हा सामना १३ जुलै रोजी वेल्स येथे खेळला गेला. डोक्याला दुखापत झाल्यानंतर त्यांना कार्डिफ येथील वेल्सच्या युनिवर्सिटी ऑफ वेल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विल्यम्स यांची प्रकृती गंभीर होती. ते कोमात गेले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गुरुवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. यासंदर्भात पेम्ब्रॉकशायर क्रिकेट क्लबने ट्विट मार्फत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विल्यम्स यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले.

- Advertisement -

ज्येष्ठ पंच मर्फी यांनी विल्यम्स यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विल्यम्स हे फार हुशार, कुशल आणि अनुभवी पंच होते, असे ते म्हणाले. या घटनेबाबत आपल्याला माहिती मिळाली तेव्हा आपल्या धक्काच बसल्याचेही ते म्हणाले.


हेही वाचा – स्वातंत्र्यदिनी धोनी लडाखमध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -