घरताज्या घडामोडी'लूट' काँग्रेसच्या 'डीएनए' मध्येच, अर्थमंत्र्यांची जहरी टीका

‘लूट’ काँग्रेसच्या ‘डीएनए’ मध्येच, अर्थमंत्र्यांची जहरी टीका

Subscribe

काँग्रेसच्या मनातून लूटेची भावना कधीच दूर होणार नाही. कारण त्यांच्या कार्यकाळात देशाची लूटच होत होती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union finance minister nirmala sitharaman) यांनी काँग्रेसवर (congress) चांगलाच हल्लाबोल केला आहे. ‘लूट’ काँग्रेसच्या डीएनएमध्येच आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रत्येक कार्यात त्यांना लूट दिसून येते, अशी जहरी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात कुशाभाऊ ठाकरे परिसरात मंगळवारी एका कार्यक्रमात संबोधित करताना निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तयार झालेले केंद्र सरकारच्या विकासाचा सिद्धांत लोकांना केवळ अधिकार देणे नाही तर त्यांना सशक्त बनवणे हा देखील आहे.

केंद्र सरकारच्या मुद्रिकरण योजनेतून सरकार देशाची लूट करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला त्यावर उत्तर देत निर्मला सीतारमण म्हणाल्या, ‘काँग्रेसच्या मनातून लूटेची भावना कधीच दूर होणार नाही. कारण त्यांच्या कार्यकाळात देशाची लूटच होत होती. त्यांच्या कार्यकाळात पाण्याची लूट, स्पेक्ट्रममध्ये लूट सर्व ठिकाणी लूटच होत होती. ते लूट करणारेच आहेत किंबहुना लूट त्यांच्या डिएनएमध्येच आहे’,असे म्हणत निर्मला सितारमण यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या घडामोडींवरुनही सीतारमण यांनी निशाणा साधला त्या म्हणाल्या, ‘जेव्हा काँग्रेसला बहुमताच्या स्वरुपात लोकांचा आशिर्वाद मिळतो तेव्हा ते जनतेचा विकास करण्यात अयशस्वी ठरतात. छत्तीसगडमध्ये बहुमतांनी जिंकल्यानंतरही काँग्रेस आमदार दिल्ली दौरा करुन काही दिवसांनी परत येणार आहेत. मुख्यमंत्री स्वत: म्हणतात आता आमदार परत आलेत त्यामुळे कोणताही बदल होणार नाही. काँग्रेसला लोकांची सेवा करण्यासाठी आशिर्वाद मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री इथे बसून आपले पद वाचवण्यासाठी देवाची प्रार्थना करत आहेत ही आश्चर्याची बाब आहे.’

पुढे निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, ‘जेव्हा काँग्रेसला बहुमताने लोकांचा आशिर्वाद मिळतो मात्र तो ते सांभाळू शकत नाहीत. समर्थन आणि आशिर्वाद मिळवणे एक वेगळी गोष्ट आहे परंतु लोकांची सेवा आणि शासन करणे एक वेगळी गोष्ट आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – जमावबंदी उल्लंघनामुळे प्रियंका गांधी यांना अटक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -