घरमहाराष्ट्रउद्यापासून उघडणार मंदिरांचे दरवाजे!

उद्यापासून उघडणार मंदिरांचे दरवाजे!

Subscribe

पंढरपूरच्या मंदिरात रोज १० हजार भाविकांना दर्शन

पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही 7 ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिर समितीची बैठक मंगळवारी पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर समितीकडून एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रोज 10 हजार भाविकांनाच विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.

घटस्थापनेपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असणार आहे. रोज 10 हजार भाविकांना मुख दर्शन घेता येणार आहे. त्यातील 5 हजार भाविकांना ऑनलाईन पासद्वारे दर्शन घेता येईल. तर 5 हजार भाविकांना ऑफलाईन पद्धतीने दर्शन मिळणार आहे. तर पंढरपूरमधील भक्तांना सकाळी 6 ते 7 असा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तासाला 1 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, 65 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरात फुले, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून मंदिर उघडण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

सिद्धीविनायक मंदिरासाठी क्यूआर कोड बंधनकारक

मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात प्रवेशासाठी क्यूआर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. क्युआर कोड दाखवल्यानंतर शरीराचे तापमान व्यवस्थित असेल आणि मास्क घातला असेल तरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंदिराच्या आवारात आल्यावर स्वत:ची चप्पल स्वत: काढून केलेल्या व्यवस्थेत ठेवावी लागणार आहे. त्याचबरोबर पाय धुवून व्यवस्थित सॅनिटायईज करून मंदिरात प्रवेश करता येईल. मंदिरात बाहेरील कोणतीही वस्तू, जसे हार, प्रसाद, नारळ आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. सहा फुटाचे अंतर राखूनच भाविकांना दर्शन मिळणार आहे. मंदिरात जमिनीवर स्टिकर लावण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने प्रत्येकजण पुढे सरकेल, असे आदेश बांदेकर म्हणाले.

- Advertisement -

सकाळी सात वाजता दर्शन सुरू होणार आहे. प्रत्येक तासाचे क्यूआर कोड असणार आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत बारा ते एक नैवेद्यासाठी मंदिर बंद राहील. यावेळेत प्रवेश घेता येणार नाही. पुन्हा एक वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यात सर्व भाविकांना ज्यांनी आपले बुकिंग केले आहे, त्यांना दर्शन घेता येणार आहे. महत्त्वाची सूचना दर गुरुवारी दुपारी बारा वाजता क्यूआर कोड मंदिर न्यासाकडून उपलब्ध होतील. ६ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी मंदिराकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे.

ज्यांना ज्यांना आपले अ‍ॅप डाऊनलोड करून आपली वेळ निश्चित करायची आहे, त्यांना उद्या दिनांक ६ ऑक्टोबरपासून दुपारी बारा वाजता ७ ऑक्टोबरपासूनच्या दर्शनाचे क्यूआर कोड उपलब्ध होतील. त्यानंतर दर गुरुवारी पुढच्या आठवड्याचे क्यूआर कोड देण्यात येतील. यापूर्वी या यंत्रणेतून सर्व भाविकांनी दर्शन घेतले होते. जर ऑनलाईन मार्फत क्यूआर कोड घेऊन अपॉईंटमेंट घेऊ शकला नाहीत, तर आपल्याला दर्शन घेता येणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ऑफलाईन दर्शनाची व्यवस्था पूर्णतः बंद करण्याचा निर्णय न्यासा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करूनच वेळ आरक्षित करून आपल्याला यायचे आहे,’ असे आदेश बांदेकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -