घरदेश-विदेशदिल्लीत लस येईपर्यंत शाळा बंदच; महाराष्ट्राचं काय?

दिल्लीत लस येईपर्यंत शाळा बंदच; महाराष्ट्राचं काय?

Subscribe

राजधानी दिल्लीत कोरोनाचा फैलाव वेगात होत असल्याने सध्या तरी दिल्लीतील शाळा बंद राहणार असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले आहे.

देशभरासह दिल्लीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केल्याचे समोर आले आहे. यानुसार राजधानी दिल्लीत कोरोनाचा फैलाव वेगात होत असल्याने सध्या तरी दिल्लीतील शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत दिल्लीतील शाळा सुरू होणार नाहीत, असे मनिष सिसोदिया यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दिल्लीत तरी लवकर शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या मार्चपासून दिल्लीतील शाळा बंद आहेत. दिल्लीत गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून कोरोना व्हायरसची तिसरी लाट सुरू आहे.

दरम्यान, दिल्लीतील पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचे ३० ऑक्टोबर रोजी सिसोदिया यांनी सांगितले होते. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती. आता सिसोदिया यांनी थेट जोवर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. यावेळी सिसोदिया यांनी असेही स्पष्ट केले की, आम्ही पालकांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना काय वाटते, त्यांचे मत जाणून घेत आहोत. ज्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या, त्याठिकाणी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे दिल्लीतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु

तर एकीकडे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. पण, मुंबई महापालिकेच्या शाळा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासह महाराष्ट्र राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयानुसार येत्या २३ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा संसर्ग वेगवान होत असल्याने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील स्थानिक प्रशासनाच्या निर्णयावर राज्यातील शाळा कधी उघडणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे.


मुंबईतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच; महापालिका आयुक्तांचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -