घरदेश-विदेशव्यसन करणाऱ्या यादव पुत्राची आईनेच केली हत्या

व्यसन करणाऱ्या यादव पुत्राची आईनेच केली हत्या

Subscribe

उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांच्या मुलाच्या हत्ये प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. नशा करत होता म्हणून आईनेच मुलाचे जीव घेतले असल्याचे सांगितले.

उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांच्या मुलाच्या खूनाप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर न्यायालयासमोर उभे केले असता महिलेला १४ दिवशीय न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.  रमेश यांचा मुलगा अभिजीत यादव याचा खून काही दिवसांपूर्वी झाला होता. या खूनाच्या तपासादरम्यान त्यांची पत्नी मीरा यादवने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी हत्येची चौकशी करण्यासाठी मीरा आणि तिचा मोठा मुलगा अभिषेक यांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. अभिजीतला दारूचे व्यसन करुन घरी येत असल्याने घरचे त्यावर नाराज होते. या कारणामुळे अभिजीत आणि घरच्यांचे नेहेमी वाद होत होते. हत्येच्या रात्रीही अभिजीत व्यसन करुन घरी आला होता. त्यावेळी झालेल्या वादात त्याचा मृत्यू झाला. अभिजितच्या हत्येला लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शवविच्छेदन अहवालानंतर त्याचा खून करण्यात आल्याचे समजले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा असल्यामुळे अभिजीत हा नेहेमी बिनधास्त राहात होता. त्याला दारूचे व्यसन होते. खून झाला त्या रात्रीही तो नशेत होता. त्यावेळी झालेल्या वादातून अभिजीतचा खून करण्यात आला. खूनाचे प्रकरण लपवण्याचा घरच्यांनी प्रयत्न केले.अभिजीतच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. मात्र अभिजीतच्या डोक्यावरील आणि गळ्यावरील वार बघून त्याचा खून झाला असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी अभिजीतच्या घरच्यांची चौकशी केली असता त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -