घरदेश-विदेशउत्तरप्रदेश इन्काऊंटर; तोंडाने आवाज काढणाऱ्या पोलिसाला मिळणार शौर्य पुरस्कार

उत्तरप्रदेश इन्काऊंटर; तोंडाने आवाज काढणाऱ्या पोलिसाला मिळणार शौर्य पुरस्कार

Subscribe

उत्तरप्रदेश इन्काऊंटरमध्ये तोंडाने 'ठो-ठो' आवाज काढला होता. पिस्तुल खराब झाल्याने पोलिसांवर गोळीबार करणाऱ्यांवर दबाव बनवण्यासाठी त्यांनी तोंडाने आवाज काढला होता. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. उत्तरप्रदेश पोलिसांकडून त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

चार दिवसापूर्वी उत्तरप्रदेश पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यातील या व्हिडिओमध्ये पोलिसाची पिस्तुल खराब झाल्याने पोलिसाने तोंडाने एनकाऊंटर केल्याचा ‘ठो ठो’ आवाज काढला. या व्हिडिओवर उत्तरप्रदेश पोलिसांच्या कामगिरीवर खूप थट्टा केली गोली. मात्र आता उत्तरप्रदेश पोलीस विभागाने तोंडाने ‘ठो ठो’ आवाज काढून एनकाऊंटर करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकाला शौर्य पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

पोलिसांला मिळणार साहसी पुरस्कार

तोंडाने आवाज काढून एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक दरोगा मनोजकुमार यांनी साहसिचे काम केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव साहसी पुरस्कारासाठी डीजीपीला पाठवण्यात आले आहे. एसपी यमुना प्रसादने सांगितले की, माझे सहयोगी पोलीस उपनिरिक्षक मनोज कुमार यांनी एका हिरोचे काम केले आहे. पोलीस विभागाने त्यांच्या या कामगिरीला सकारात्मक घेतले आहे. मनोज यांची पिस्तुल खराब झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहयोगिचे मनोबल वाढवण्यासाठी तोंडातून ठांय ठांय आवाज काढला.

असे केले इन्काऊंटर

१३ ऑक्टोबरला असमौली पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये रात्री साडे अकरा वाजता पोलीस वाहनांची तपासणी करत होते. त्याच दरम्यान एका बाईकवरुन दोन जण आले. पोलिसांनी अडवले असता दोघेही जण सुसाट निघून गेला आणि उसाच्या शेतामध्ये जाऊन लपून त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान घटनास्थळावर अतिरिक्त पोलिसांना बोलावून उसाच्या शेताला घेराव घालण्यात आला. मनोज कुमार आणि पोलीस कॉन्स्टेबल बलराम यांनी घटनास्थळावर आरोपी गोळीबार करत असल्याचे पाहून त्यांनी पिस्तुल बाहेर काढले. मनोज यांनी पिस्तुल खराब असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी तोंडांने ‘ठांय ठांय’ आवाज काढून ऊसाच्या शेतात घुसले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये मनोज कुमार ‘मारो-मारो, घेरो-घेरो, ठो-ठो’ असे बोलत आहेत.

- Advertisement -

केलेल्या कामाबद्दल दु:ख नाही

पोलीस उपनिरिक्षक मनोज कुमार यांनी सांगितले की, २८ वर्षापासून ते पोलीस विभागात नोकरी करत आहेत. इंन्काऊंटच्या दिवशी त्यांनी जे काही केले त्याबद्दल त्यांना काहीच दु:ख नसल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, माझी पिस्तुल खराब झाली. त्यामुळे मी ऊसाच्या शेतामध्ये लपून बसून गोळीबार करणाऱ्यांवर दबाव बनवण्यासाठी असे केले. गोळीबार करणाऱ्यांना हे दाखवून द्यायचे होते की ते चार ही बाजून घेरले गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -