घरताज्या घडामोडीउत्तर प्रदेशच्या १५ कोटी जनतेला योगी सरकारकडून गिफ्ट, पुढील तीन महिने मोफत...

उत्तर प्रदेशच्या १५ कोटी जनतेला योगी सरकारकडून गिफ्ट, पुढील तीन महिने मोफत रेशन

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहील्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील १५ कोटी जनतेला अनोखे गिफ्ट दिले आहे. या बैठकीत मोफत रेशन (Free Ration Scheme) योजनांतर्गत पुढील सलग तीन महिने जनतेला मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत स्वत: ही घोषणा केली आहे.

या बैठकीनंतर योगी यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील जनतेला मोफत रेशन योजनेंतर्गत पुढील तीन महिने मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील १५ कोटी जनतेला त्याचा लाभ मिळणार आहे . तर युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी या योजनेसाठी ३२७० कोटी रुपये खर्च असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी योगी यांनी दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या आमच्या सरकारचा पहीला निर्णय १५ कोटी गरीब जनतेला समर्पित असल्याचे सांगितले. तसेच कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाचा विचार करुन अन्नयोजना सुरू केली होती. एप्रिल २०२० ते मार्च २०२२ पर्यंत या योजनेचा लाभ ८० कोटी जनतेला मिळाला असून राज्य सरकारने केंद्र सरकारची हीच मोफत रेशन योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य केल्याचे म्हटले आहे. तसेच मोफत कोरोना तपासण्या, उपचार आणि लसींनंतर कोरोनावर नियंत्रण जरी मिळवता आले असले तरी उपासमारीमुळे जनेतेचे हाल झाले. यावेळी सरकारच्या मोफत रेशन योजना फायदेशीर ठरली. ही योजना मार्च २०२२ मध्ये संपत आहे. मात्र पुन्हा नव्याने सत्तेत आलेल्या राज्य सरकारने पुढील तीन महिने ही योजना सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. असे यावेळी योगी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -