घरCORONA UPDATEकोरोनाचा प्रसार करण्यात WHO पण जबाबदार; महासंचालकांनी राजीनामा द्यावा, अमेरिकेची मागणी

कोरोनाचा प्रसार करण्यात WHO पण जबाबदार; महासंचालकांनी राजीनामा द्यावा, अमेरिकेची मागणी

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही काही प्रमाणात चीनकडून पारदर्शकता न ठेवल्याबद्दल दोषी आहेत, असा आरोप अमेरिकेच्या सिनेट सदस्याने केला आहे.

अमेरिकन राजकारण्यांनी कोरोना विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस घेबेरियस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चीनने कोरोनाबाबत जी माहिती दिली त्याला जागतिक आरोग्य संघटनेने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यावरुन जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव वाढत आहे. दरम्यान, जगात कोरोना संक्रमण आणि मृत्यूंचे प्रमाण सतत वाढत आहे. कोरोना विषाणूबाबत चीनच्या कम्युनिस्ट सरकारवर विश्वास ठेवला म्हणून अमेरिकन राजकारणी जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकावर प्रश्न उपस्थित करत आहेत. बऱ्याच पाश्चात्य देशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनने कोरोना संसर्गाबाबत योग्य माहिती दिली नाही. अमेरिकेच्या रिपब्लिकन सिनेटच्या सदस्या मार्था मॅकस्ली म्हणाल्या की जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी चीनला कव्हर-अप केलं म्हणून राजीनामा द्यावा. पुढे म्हणाल्या जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही काही प्रमाणात चीनकडून पारदर्शकता न ठेवल्याबद्दल दोषी आहेत.


हेही वाचा – कोरोना विषाणू मास्क, चलनी नोटा आणि प्लास्टिकवर ‘एवढा’ वेळ जिवंत राहतो!

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ५५ वर्षांचे आहेत आणि ते इथिओपियाचे आहेत. ट्रेडोसबाबत सिनेटच्या सदस्या मॅकस्ली म्हणाले की त्यांनी जगाला फसवलं आहे. इतकेच नाही तर ट्रेडोस यांनी कोरोना व्हायरस प्रतिसादाबाबत चीनच्या पारदर्शकतेचेही कौतुक केलं होतं. मॅकस्ली म्हणाल्या की त्यांनी कोणत्याही कम्युनिस्टवर कधीही विश्वास ठेवला नाही आणि चीन सरकारने चीनमधून आलेला विषाणू लपवला आणि यामुळे अमेरिका व जगात विनाकारण मृत्यू ओढवला. म्हणून टेड्रोसने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. डेली मेलच्या अहवालानुसार फेब्रुवारीमध्ये जेव्हा चीनमध्ये १७,२३८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि ३६१ लोकांचा मृत्यू झाला होता, तेव्हा टेड्रोस म्हणाले की प्रवासावर बंदी घालण्याची गरज नाही. अमेरिकन रिपब्लिकन सिनेटचे सदस्य टेड क्रूझ यांनीही जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालकांना काढून टाकण्याविषयी बोलले आहे. क्रूझ यांना असं वाटतं की जागतिक आरोग्य संघटनेने आवश्यक विश्वासार्हता गमावली आहे.

काही लोक असा आरोप करतात की चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंची वास्तविक संख्या ४० हजारांपर्यंत असू शकते. अधिकृतपणे, चीनने सुमारे ३३०० मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. वुहानमध्ये अधिकृतपणे केवळ २,५४८ लोक मरण पावले आहेत. परंतु स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की येथील स्मशानभूमीतून दररोज तब्बल ५०० अस्थि कलश दिले जात होते.

- Advertisement -

फ्लोरिडाचे राजकिय नेते मार्को रुबीओ यांनी म्हटलं आहे की, महामारी कशी हाताळली जाते यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचीही जबाबदारी निश्चित करावी. ते म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी बीजिंगला जगाची दिशाभूल करण्याची परवानगी दिली. त्याचवेळी यूएनमध्ये अमेरिकेची माजी राजदूत निक्की हेले यांनीही जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना विषाणूसंदर्भात केलेल्या विधानांवर टीका केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -