घरCORONA UPDATEVideo: वॉर्डबॉयने ३० रुपये मागितले; ६ वर्षांच्या मुलाने आजोबांना स्वतःच खेचत नेले

Video: वॉर्डबॉयने ३० रुपये मागितले; ६ वर्षांच्या मुलाने आजोबांना स्वतःच खेचत नेले

Subscribe

कोरोनाच्या काळात रूग्ण सेवांवर येणाऱ्य तणावामुळे अनेकदा रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. काहींना वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर काहींना रूग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. रूग्णांनी कधी हॉस्पिटलच्या पायऱ्यांवरच अखेरचा श्वास घेतला तर कधी प्रवासातच त्यांचा जीव गेला. अशा घटनांनी मन हेलावले असतानाचा आता हा लहानग्याचा व्हिडिओ समोर येत आहे. उत्तर प्रदेशमधील एका हॉस्पिटलमध्ये आपल्या जखमी आजोबांचे स्ट्रेचर ढकलणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॉस्पिटल कर्मचाऱ्याला लाच न दिल्याने आईसह या लहानग्यालाच हे स्ट्रेचर बेडपर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली असल्याचे समजते.

दरम्यान, स्वाती मलिवाल या महिलेने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत, कंधे छोटे हैं, लेकिन प्यार माँ से अधिक है, असं म्हटलं आहे. तर आत्मनिर्भरतेचे हे उदाहरण पुरेसे आहे की आणखी दाखवू, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे.

- Advertisement -

काय आहे घटना 

ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यामधील एका हॉस्पिटलची आहे. देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे जीवंत उदाहरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रूग्णाला हॉस्पिटलमधून स्ट्रेचर तर उपलब्ध झाले मात्र त्याला वॉर्डपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणताही कर्मचारी उपलब्ध झाला नाही. रूग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलची महिला कर्मचारी या कामाकरता पैशाची मागणी करत होती. ज्या महिलेने हे स्ट्रेचर ओढले तिच्या म्हणण्यानुसार, आम्ही खुप गरिब आहोत. वडिलांच्या उपचारासाठी जेव्हा जेव्हा स्ट्रेचर मागायला जातो, तेव्हा आमच्याकडून पैशाची मागणी होते. आम्ही पैसे देऊ शकत नाही, असे त्या महिलेने आज तकला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे. बिंदू यादव असे त्या महिलेचे नाव आहे. रूग्ण हे बिंदूचे वडिल असून त्यांना ३ जुलैपासून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘ही’ आहे खुशखबर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -