चारधाम तीर्थयात्रेस जाणारी बस दरीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू

चारधाम (Chardham) यात्रेला जाणारी बस दरीत कोसळून २५ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशी परिसरात घडली.

चारधाम (Chardham) यात्रेला जाणारी बस दरीत कोसळून २५ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशी परिसरात घडली. या बसमध्ये एकूण २८ यात्रेकरू होती, यापैकी २५ यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून, बाकीचे तीन यात्रेकरू गंभीर जखमी झाले आहेत. या तीन जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफच्या (NDRF) जवानांनी धोव घेत बचाव कार्याला सुरूवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पन्ना जिल्ह्यातील २८ यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस उत्तरकाशीतील दमताजवळ दरीत कोसळली. दरम्यान, हे सर्व प्रवासी ट्रेनने हरिद्वारला पोहोचले होते. त्यानंतर ते बस क्रमांक UK-04-1541 मध्ये चढून उत्तरकाशीला जात होते. त्याचवेळी उत्तरकाशी जिल्ह्यातील दमताजवळ ही बस दरीत कोसळली.

२५ मृतदेह बाहेर काढले

या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत २५ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र कोणाचीही ओळख पटलेली नाही. त्याचबरोबर अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या दुर्घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी शोक व्यक्त केला आहे. यांनी ट्विट केले की, “उत्तरकाशीच्या पुरोला येथील दमताजवळ प्रवासी बसला अपघात झाल्याची दुर्दैवी बातमी मिळाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. तसेच, सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”, त्यानी म्हटले.

मृत पावलेल्या यात्रेकरूंना श्रद्धांजली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही अपघातात मृत पावलेल्या यात्रेकरूंना श्रद्धांजली वाहिली आहे. अमित शाहा यांनी ट्विट करत, “उत्तराखंडमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याचे ऐकून खूप वाईट वाटले. याबाबत मी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्यात गुंतले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. “उत्तराखंडमधील बस दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे.”, असे त्यांनी म्हटले.


हेही वाचा – किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा; शिवप्रेमींसाठी विशेष सुविधा