घरताज्या घडामोडीViral Video: Corona Break! लग्नाची वरात पाहताच एम्ब्युलन्स ड्रायव्हरचा PPE KIT घालूनच...

Viral Video: Corona Break! लग्नाची वरात पाहताच एम्ब्युलन्स ड्रायव्हरचा PPE KIT घालूनच ठेका

Subscribe

देश सध्या कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. काही दिवसांपासून दिवसाला अडीच हजारांहून अधिक जणांचे जीव जात आहेत, तर तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाच्या या भीतीदायक आकड्याने प्रत्येकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः असे लोकं जे सध्या रात्रंदिवस कोरोना रुग्णांची देखभाल करत आहेत. यामुळे सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तणावचे वातावरण आहे. अशातच उत्तराखंडच्या हलद्वानीमधील एका रुग्णावाहिका चालकाने तणाव दूर करण्यासाठी एक अनोखा उपाय केला आहे.

सध्या सोशल मीडियावर या रुग्णावाहिका चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये रुग्णवाहिका चालक पीपीई कीट घालून वरातीमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. जेव्हा हा चालक डान्स करतो तेव्हा आजूबाजूचे लोकं घाबरून बाजूला गेल्याचे पाहायला मिळत आहे. या रुग्णवाहिका चालकाला जेव्हा डान्स करण्यामागेच कारण विचारले असता, तेव्हा तो म्हणाला की, दिवसभर तणावात असतो. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी डान्स करू लागलो.

- Advertisement -

रुग्णवाहिका चालकाचे नाव महेश असून त्याने पुढे सांगितले की, सतत कोरोना रुग्णांना आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी काम करत असतो. यामुळे तो तणावात होता. जेव्हा त्याने वरात येताना पाहिली, तेव्हा तो स्वतःला रोखू शकला नाही आणि आपला तणावाला दूर करण्यासाठी बँडबाजाच्या तालावर तो डान्स करू लागला. डान्स केल्यानंतर त्याचे मन थोडे हलके झाले आणि तणाव देखील कमी झाला.

अजब गजब – जब अचानक बारात देखते ही झूमने लगा एंबुलेंस का ड्राइवर, PPE किट में किया शानदार डांस

अजब गजब – जब अचानक बारात देखते ही झूमने लगा एंबुलेंस का ड्राइवर, PPE किट में किया शानदार डांस

बताया जा रहा है कि सोशल मीडिया में वायरल वीडियो हल्द्वानी का है. जब एंबुलेंस से उतरकर ये ड्राइवर पीपीई किट पहने ही बैंड की धुन पर जमकर डांस करने लगा. बारात में पीपीई किट पहनकर एंबुलेंस चालक के डांस को देख सभी लोग हैरत में पड़ गए. हालांकि, बारात में शामिल लोगों ने पीपीई किट पहने एंबुलेंस चालक से दूरी भी बना ली ।

एंबुलेंस चालक ने बताया कि लगातार कोविड के मरीजों को अस्पताल लाने ले जाने का काम कर रहा है. अधिक काम करने के चलते तनाव में था. उसने बारात देखी तो अपने आप को रोक नहीं सका. अपने तनाव को दूर करने के लिए बैंड बाजे की धुन पर डांस करने लगा.
चालक के मुताबिक डांस करने के बाद थोड़ा मन को हल्का लगा, इसीलिए उसने डांस किया. फिलहाल वायरल वीडियो की लोग जमकर सराहना कर रहे हैं.

https://www.etvbharat.com/hindi/uttarakhand/state/nainital/a-video-of-an-ambulance-driver-wearing-a-ppe-kit-dancing-at-a-wedding-in-haldwani-went-viral/uttarakhand20210427141507213

https://www.facebook.com/watch/?v=376221383600923

https://www.facebook.com/watch/?v=4014818488565326

https://www.facebook.com/watch/?v=298842021789967

Posted by श्रीनगर दर्शन on Tuesday, April 27, 2021

- Advertisement -

 

कोविड-१९ इंडियाच्या ट्रॅकरनुसार, उत्तराखंडमधील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५६ हजार ८५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ हजार २१३ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख १२ हजार २६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३९ हजार ३२ जणांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – ICU बेड मिळवण्यासाठी थेट HC मुख्य न्यायाधीशांनीच केला BMC Covid-19 हेल्पलाईनवर फोन


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -