घरताज्या घडामोडीऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयाने शोधली करोनावरील लस

ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयाने शोधली करोनावरील लस

Subscribe

करोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला असून चीनमध्ये आतापर्यंत करोनाने ८०० जणांचे बळी घेतले आहेत. अशातच एका ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयाने कोरोनावरील लस शोधली आहे.

चीनमध्ये पसरलेल्या करोना व्हायरसची लागण आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांना झाली असून २६ जणांचा बळी गेला आहे. करोना व्हायरसने जगभरात मोठ्याप्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या आजारावर उपाय शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे. यावर अनेक शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच, एका ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या भारतीय संशोधकाने करोनाच्या विषाणूवर लस बनवण्याच्या आपण अगदी जवळ असल्याचा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियामधील कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या एका हाय- सेक्युरिटी प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात येत आहे. याठिकाणी संशोधनासाठी सर्व आवश्यक त्या सोईसुविधा संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

करोनाचा संसर्ग झालेल्या एका व्यक्तीकडून या विषाणूच्या नमून्यापासून हा विषाणू आयसोलेट करण्यात ऑस्ट्रेलियाच्या डॉर्टी इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी गेल्याच आठवड्यात यश मिळवले होते. आयसोलेट करण्यात आलेला हा विषाणू आम्हाला दाखवण्यात आल्याचे CSIRO चे पॅथोजन्सचे प्रमुख प्राध्यापक एस. एस. वासन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तसेच, डॉर्टी इन्स्टीट्यूटच्या सहकाऱ्यांचेही आयसोलेट करण्यात आलेला विषाणू दाखवल्याबद्दल प्राध्यापक वासन यांनी आभार मानले आहेत. जगभरात करोना विषाणूवर औषध तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून, औषध तयार करण्याच्या प्रयत्नांनाही गती मिळेल अशी आशा वासन यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

३० डिसेंबर २०१९ मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता

चीनच्या वुहान येथे ३० डिसेंबर २०१९ मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी आजाराचं निरीक्षण केल्यानंतर हा करोना व्हायरस असल्याचं त्यांना आढळून आलं. गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत पाचशेहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, करोना व्हायरसमुळे चीनमध्ये तब्बल २४ हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा एका वृत्तसंस्थेने केला आहे. चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -