जन्मठेपेच्या शिक्षेवर दया याचिका सावरकरांनी गांधीच्या सांगण्यावरून केली- राजनाथ सिंह

defence minister rajnath singh shastra pooja darjeeling dussehra sukna war memorial

भाजपचे जेष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात एक मोठे वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केले आहे. वीर सावकरक हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अंदमानच्या तुरूंगात असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच विनायक सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली होती, असे वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केला आहे. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि कार्याबद्दल मतभेद असू शकतात, पण त्यांच्या विचारसरणीवरून देशासाठीचे योगदान नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन या कार्यक्रमाच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांचीही कार्यक्रमाला हजेरी होती. राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या विचारसरणीच्या निमित्तानेही यावेळी वक्तव्य केले. एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेला गट हा सावरकरांच्या जीवन आणि विचारधारेपासून वंचित आहे. अनेकदा सावरकरांच्या योगदानाबाबत प्रश्नचिन्ह केले जाते. पण सावरकर हे महान स्वातंत्र्य सेनानी होते आणि आहेत, भविष्यातही असतील.

ब्रिटिशांनी दोनवेळा सावकरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण त्यांची देशाला स्वांत्र्य मिळवून देण्याची इच्छा किती प्रबळ होती याचा अंदाज त्यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवरून येतो. पण काही विशिष्ट विचारसरणेचे लोक मात्र अशा नायकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची खंत सावकरांनी व्यक्त केली. सावकरांवर काही लोकांकडून नाझी, फॅसिस्ट असल्याचा आरोप होतो. ज्यांनी असे आरोप केले ते स्वतः लेनिनवादी, मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित झाले आणि अजुनही आहेत. सावरकर हे वास्तववादी आणि राष्ट्रवादी होते. निरोगी लोकशाहीची ते चर्चा करायचे असाही राजनाथ सिंह यांनी खुलासा केला.