घरदेश-विदेशउपराष्ट्रपती पदाची निवडणूक राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपेक्षा किती वेगळी असते?

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपेक्षा किती वेगळी असते?

Subscribe

देशात 1952 मध्ये सर्वप्रथम राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली

भारतात जिथे अप्रत्यक्षपणे निवडून आलेले खासदार आणि आमदार राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात तिथे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी केली जाणार आहे. 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्जांची छाननी 20 जुलै रोजी होणार आहे. 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. आणि ६ ऑगस्टला मतमोजणीही होणार आहे.

देशात 1952 मध्ये सर्वप्रथम राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली. त्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले. राष्ट्रपतींप्रमाणेच उपराष्ट्रपतींचा कार्यकाळही 5 वर्षांचा असतो. ही निवडणूक महत्त्वाची यासाठी आहे कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात.

- Advertisement -

संसदेतून होते उपराष्ट्रपतींची निवड

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे उपराष्ट्रपतीची निवड केली जाते. यात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित असतात. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला एकच मत देता येते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांसोबत आमदारही मतदान करतात, परंतु उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनाच मतदान करता येते.

नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकतात का?

दोन्ही सभागृहांसाठी नामनिर्देशित खासदार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करु शकत नाहीत, परंतु उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करु शकतात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे 790 मतदार सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

लोकसभा – निवडून आलेले सदस्यः 543, नामनिर्देशित सदस्यः 2

राज्यसभा – निवडून आलेले सदस्यः 233, नामनिर्देशित सदस्यः 12


बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतुकीतही बदल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -