घरमहाराष्ट्रबंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतुकीतही बदल

बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतुकीतही बदल

Subscribe

हे बंडखोर आमदार कालच गुवाहाटीवरूनग गोव्यात पोहोचले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच, केंद्र सरकारकडूनही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सत्तापेचाच्या डावात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा काल, बुधवारी रात्री दिला. या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं असून पुढील सत्तास्थापनेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईत अनुचित प्रकार घडू नयेत याकरता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. बंड पुकारून गुवाहाटीत गेलेले आमदार आज पुन्हा मुंबईत परतणार आहेत. हे बंडखोर आमदार कालच गुवाहाटीवरूनग गोव्यात पोहोचले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच, केंद्र सरकारकडूनही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Rebel mla come in mumabi, Strict police security)

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, ३१ महिन्यांत आघाडी सरकार कोसळले

- Advertisement -

बंडखोर आमदार आज कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होतील. तर दुसरीकडे भाजपकडून सत्तास्थापनेसाठी वेग आला आहे.  त्यामुळे मुंबईतील वातावरण शांत ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आली आहे. दरम्यान, २० डिसीपी आणि त्यांच्या दर्जाचे पोलीस अधिकारी, 20 डिसीपी आणि त्यांच्या दर्जाचे पोलीस अधिकारी, 45 एसीपी, 225 पोलीस इन्स्पेक्टर, 725 असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस सबह इन्स्पेक्टर, 1250 महिला पोलीस हवालदार, 25000 पोलीस हवालदार आणि एसआरपीएफच्या 10 तुकड्या शिवाय 750 जणांची अतिरीक्त फोर्स मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येत असल्याची माहिती डीसीपी संजय लाटकर यांनी दिली होती.

हेही वाचा – ‘बदला’च्या राजकारणाचा आज अंत – आमदार नितेश राणे

- Advertisement -

तर, आमदारांच्या वाहतुकीसाठी मुंबईतील वाहतुकीतही बदल करण्यात आळे आहेत. यासाठी पोलिसांची मदत घेतली आहे. तसेच, आज मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले असून संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूममीवर विधान भवन आणि आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांना फिरकू न देण्याची खबरदारीही घेतली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

उद्धव ठाकरे यांनी संवादात काय म्हटलं?

मी आश्वस्त केले होत जे सुरू केलंय ते सुरू राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले. संभाजीनगर नामकरण आज दिले. शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकाऱ्यांना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन.

हेही वाचा  एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला : संजय राऊत

अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळं दिलं. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.

न्याय देवतेने निकाल दिलाय. फ्लोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ति सुरतला गुवाहटीला जाऊन सांहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

आम्ही हपालेले होऊन जात नाही मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि मुस्लिमांनि पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -