घरदेश-विदेशचंदा कोचर प्रकरणी सीबीआयने केली 'ही' मोठी कारवाई

चंदा कोचर प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवाई

Subscribe

आयसीआयसीआय बँकेचा लोन गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांच्या कार्यालयांबरोबरच त्यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्याधिकारी चंदा कोचर यांनी लोनमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोपाअंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करत आहे. या प्रकरणी व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले आहेत. वेणुगोपाळ यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयावरही सीबीआयने छापे मारले आहेत. व्हिडीओकॉनला आयसीआयसीआय बँकेने ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या कर्जात गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून चंदा कोचर यांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत  सीबीआय ने फक्त कागदोपत्र आणि चौकशी केली होती मात्र या प्रकरणी आता छापेही मारले गेले आहेत. या चौकशीत अजून काही मोठ्या लोकांची नावे समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई आणि औरंगाबाद कार्यालयावर छापेमारी

अधिकाऱ्यांनी दिलेल्यामाहितीनुसार सीबीआयने व्हिडीओकॉन समुहाच्या औरंगाबाद आणि मुंबई कार्यालयांवर छापेमारी केली आहे. मुंबईत ४ आणि औरंगाबाद येथील २ कार्यालयांवर छापे मारण्यात आले आहे. या प्रकरणी काही मोठ्या लोकांचे नाव ही समोर येण्याची शक्यता सीबीआयकडून वर्तवली जाते आहे. घेतलेल्या कर्जाबद्दल काही पूरावे मिळतात का? याचा शोध घेण्यासाठी हे छापे मारण्यात आले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

चंदा कोचर यांचे पती दीपक आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख धूत यांनी २००८ मध्ये ५०-५० टक्के भागिदारीत न्यूपॉवर रिन्यूएबल प्रा.लि.ची (एनआरपीएल) स्थापना केली होती. परंतु, धूत यांनी एका महिन्यानंतर कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता आणि यातील आपले भाग दीपक यांच्या नावावर हस्तांतरित केले होते. याच दरम्यान २०१२ मध्ये व्हिडीओकॉनला आयसीआयसीआयबँकेने ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. यामध्ये २ हजार ८४९ रुपयांचे कर्ज अजूनही थकीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -