रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या संसदेत भाषण केले. यावेळी त्यांनी युक्रेनसोबतच्या युद्धासंदर्भात अनेक मोठे वक्तव्य केले. तसेच पाश्चिमात्य देशांमुळे युद्ध भडकले, असं व्लादिमीर पुतिन म्हणाले.
आम्ही हा प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत होतो. या कठीण संघर्षावर शांततेने वाटाघाटी करत होतो. पण आमच्या पाठीमागे खूप वेगळे वातावरण तयार केले जात होते. आम्ही आमच्या हिताचे आणि स्थानाचे रक्षण करतो की, सुसंस्कृत देश आणि बाकीचे देश यांच्यात कोणतेही विभाजन होऊ नये, असं पुतिन म्हणाले.
कीव यांनी लष्करी कारवाईतून शस्त्रास्त्र पुरवठ्याबाबत पश्चिमेशी वाटाघाटी केल्या होत्या. पाश्चिमात्य देशांनी आपल्या लोकांचा विश्वासघात केला आहे. अमर्याद सत्ता हे पाश्चिमात्यांचे ध्येय आहे, असंही पुतिन म्हणाले. आमच्या लोकांची सुरक्षा महत्वाची असून तिच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
रशियामध्ये नाटोचा हस्तक्षेप सातत्याने वाढत आहे. पाश्चात्य देश आपली शक्ती वाढवण्यासाठी युक्रेन युद्धाला खतपाणी घालत आहे. युक्रेननेही या हत्यांना प्रोत्साहन दिले आहे. तो वाटाघाटीच्या टेबलावर आला असता तर इतके नुकसान झाले नसते. युक्रेन युद्धाचे निमित्त करून अमेरिका आपली शस्त्रं विकण्याचा प्रयत्न करत आहे. तर पाश्चात्य देश या युद्धाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करत आहेत. हे देश रशियाच्या संस्कृतीवर आक्रमण करत आहेत आणि दररोज नवनवीन आव्हानं मांडत आहेत, असं पुतिन म्हणाले.
हेही वाचा : फेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होणार, हवामान विभागाचा इशारा