घरAssembly Battle 2022Punjab Election 2022 Phase 3 Voting: पंजाबमध्ये १७.७७ आणि यूपीत २१.१८ टक्के...

Punjab Election 2022 Phase 3 Voting: पंजाबमध्ये १७.७७ आणि यूपीत २१.१८ टक्के मतदान, ३ तासांत १८ टक्के मतदानाचा वेग वाढला

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याला आज(रविवार) सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. मागील ३ तासांमध्ये पंजाबमध्ये १७.७७ टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये २१.१८ टक्क्यांपर्यंत मतदान झालं असून १८ टक्के मतदानाचा आकडा वाढला आहे. पंजाबमध्ये १७७ जागांसाठी तर यूपीमध्ये ५९ जागांसाठी मतदान होत आहे.

- Advertisement -

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि करहल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अखिलेश यादव यांनी मतदान केले आहे. तर पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांनी मतदान केले. सकाळी ९ वाजेपर्यंत पंजाबमध्ये ४.८० मतदान झाले असून उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ८.१५ टक्के मतदान झाले आहेत. व्हिलचेअरवर बसून मतदानासाठी आलेले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शिवपाल सिंह यादव हे इटावामधील जसवंतनगरमधून समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत.

- Advertisement -

पीएसपीचे नेते शिवपाल सिंह यादव यांनी आज सकाळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची त्यांच्या इटावा येथील निवासस्थानी भेट घेतली. पंजाबचे मंत्री भारत भूषण आशु यांनी लुधियाना येथे मतदान केले.

जालंधरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत ११.०२ टक्के मतदान पूर्ण

आदमपूर – १०.३ टक्के

जालंधर कॅंट – १३.४ टक्के

जालंधर मध्य – ९.४ टक्के

जालंधर उत्तर – १४.२ टक्के

जालंधर पश्चिम – ६.६ टक्के

करतारपूर – ११.२ टक्के

नकोदर – ११.४ टक्के

फिल्लौर – १०.०६ टक्के

शाहकोट – ८.३ टक्के

पंजाब निवडणूक आयोगाची वेबसाईट ठप्प

पंजाब निवडणूक आयोगाची वेबसाईट ठप्प झाली आहे. अधिकृत वेबसाईट असलेली https://www.ceopunjab.gov.in/ ठप्प झाली आहे. त्यामुळे तपशील जमा करतेवळी लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. सकाळपासून जवळपास तासाभरासाठी निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद होती. यासंदर्भात अनेक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मुख्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. कारण वेबसाईटला नॉट फाऊंड HTTP त्रुटी दाखवत असून ४०४ चा संदेश मिळत आहे.


हेही वाचा : Elections 2022 Voting Live: फर्रूखाबाद जिल्ह्यातील विधानसभा १९४ बूथ नंबर ३८ वरील ईव्हीएममधून सायकलचे चिन्ह गायब


mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -