घरदेश-विदेशसमर्पण केले तर भले होईल, बंदूक घेतली तर ठार मराल

समर्पण केले तर भले होईल, बंदूक घेतली तर ठार मराल

Subscribe

लष्कराचा काश्मिरी दहशतवाद्यांना इशारा

दहशतवादी तरुणांनी समर्पण केले तर त्यांचे भले होईल, मात्र बंदूक हातात घेतली तर मरायला तयार व्हा, असा धमकीवजा इशारा भारतातील लष्कराने काश्मीरमध्ये कार्यरत दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना दिला आहे.
पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगर येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. जैश-ए-मोहम्मद हे पाकिस्तानच्या लष्कराचेच अपत्य आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा १०० टक्के सहभाग आहे

यात आम्हाला जरा देखील शंका नाही, असे चिनार कॉर्स्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लन पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेला आयएसआय ही संस्था नियंत्रित करत असल्याचेही ढिल्लन म्हणाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे, असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोर्‍यात घुसखोरी करणार्‍या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही’, असेही ढिल्लन यांनी सांगितले.
ढिल्लन पुढे म्हणाले की, ‘किती गाझी आले आणि किती गेले, घुसखोरी करणार्‍या प्रत्येक दहशतवाद्याला ठार करणारच. काश्मीर खोर्‍यात कोणीही घुसखोरी केल्यास त्याची गय केली जाणार नाही. कोणताही दहशतवादी जिवंत राहणार नाही’.
काश्मीरमधील मातांना भारतीय लष्कराचे आवाहन

- Advertisement -

यावेळेस भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील पालकांना कळकळीचे आवाहनदेखील केले.‘दहशतवादाच्या मार्गावर जाणार्‍या तुमच्या मुलांना समजवा आणि त्यांना माघारी बोलवा. चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समर्पण करायला लावा, असे आमचे जम्मू काश्मीरमधील मातांना आवाहन आहे. आत्मसमर्पण करणार्‍यांसाठी आम्ही कित्येक चांगले उपक्रम राबवत आहोत; पण हातात बंदूक घेणार्‍यांची गय केली जाणार नाही’, असा स्पष्ट इशारा यावेळी ढिल्लन यांनी दिला.
काश्मीर पोलीसचे महासंचालक, एसपी पानी यांनी सांगितले की, 2018मध्ये जैश-ए-मोहम्मदचे 56 दहशतवादी मारले गेले. यावर्षी आतापर्यंत एकूण 31 दहतशवादी ठार करण्यात आले, यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 12 दहशतवाद्यांचा समावेश आहे.

आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत – भारतीय लष्कर
सीआरपीएफचे आयजी जुल्फीकार हसन यांनी सांगितले की, ‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांना स्वतःला एकटे समजू नये. तुमच्यासोबत आम्ही सदैव उभे आहोत. शिवाय, देशातील निरनिराळ्या भागांमध्ये शिक्षण घेणार्‍या काश्मीरी मुलांसहीत आम्ही हेल्पलाईन चालवत आहोत. जेणेकरुन त्यांना कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू नये’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -