घरताज्या घडामोडीसेक्स करताना मास्क घाला; कॅनडाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला

सेक्स करताना मास्क घाला; कॅनडाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला

Subscribe

सेक्स करताना देखील मास्क घाला, असा सल्ला एका कॅनडाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता सोशल डिस्टन्सिंग राखत मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मास्क घालणे है दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. मात्र, आता सेक्स करताना देखील मास्क घाला, असा सल्ला एका कॅनडाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

काय आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला?

अनेकांना कोरोना व्हायरस हा सेक्समुळे पसरतो का अशी शंका होती. त्यावर ते म्हणाले आहेत की, सेक्समुळे कोरोना विषाणू पसरत नाही. पण, किसिंगमुळे आणि मास्क न घालता जवळ आल्याने कोरोनाचा विषाणू पसरला जाऊ शकतो, अशी शक्यता कॅनडाच्या मेडिकल ऑफिसर डॉ. थेरेसा टॅम यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सेक्स करताना मास्क घाला, असा सल्ला टॅम यांनी दिला आहे.

- Advertisement -

‘सेक्समुळे कोरोना होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र, किसींग, तोंडा जवळ तोंड आणणे अशा प्रकारामुळे कोरोनाचे विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सेक्स करताना खबरदारी म्हणू मास्क घाला, असे टॅम यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – सासूच्या जाचाला कंटाळून ३ सूनांनी रचला कट; केली सासूची हत्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -