घरदेश-विदेशWeather Update : मे महिन्यात 48 अंशांचं तापमान झेलण्यास सज्ज राहा, दिल्लीसह...

Weather Update : मे महिन्यात 48 अंशांचं तापमान झेलण्यास सज्ज राहा, दिल्लीसह 10 राज्यांत सतर्कता, पारा वाढणार

Subscribe

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस पडण्याचा अंदाज असून, त्यामुळे उष्मा आणि उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असंही आयएमडीने म्हटले आहे.

नवी दिल्लीः देशातील सुमारे 70 टक्के लोकसंख्येपैकी 80 टक्के जनता उन्हाच्या तडाख्याने होरपळत आहे. येत्या काळात उन्हाचा तडाखा आणि त्रास आणखी वाढणार आहे. मे महिन्यात तापमान 48 अंशांपर्यंत पोहोचू शकते. तसेच उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि झारखंड या 10 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार, भारत उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि ओडिशाच्या काही भागात तापमान 45 अंशांपेक्षा जास्त पोहोचले आहे. पुढील पाच दिवस देशातील मोठ्या भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचंही आयएमडीचे शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे पुढील तीन दिवस तापमानात सुमारे 2 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती गंभीर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यामुळे उष्मा आणि उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असंही आयएमडीने म्हटले आहे. गेल्या 10 वर्षांनंतर झाशीमध्ये पहिल्यांदाच 27 आणि 28 एप्रिलला दिवसाचे कमाल तापमान 45.6 अंशांवर नोंदवले गेले. 17 एप्रिल 2010ला येथे सर्वाधिक तापमान 46.2 अंश नोंदवले गेले होते. कानपूरमध्ये गुरुवारी पारा 45.8 अंशांवर पोहोचला होता. नऊ वर्षांपूर्वी 30 एप्रिल 2013 ला एवढा कमाल पारा नोंदवला गेला होता. प्रयागराजमध्ये पारा 45.9 अंशांवर गेला आहे.

- Advertisement -

मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाची शक्यता

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस पडण्याचा अंदाज असून, त्यामुळे उष्मा आणि उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असंही आयएमडीने म्हटले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

दिल्ली @ 43.5 अंश तापमान: 12 वर्षांचा विक्रम मोडला

बुधवारी दिल्लीचे कमाल तापमान 43.5 अंश होते. जो 12 वर्षांतील हा उच्चांक आहे. यापूर्वी 18 एप्रिल 2010 ला ते 43.7 अंश होते. शुक्रवारी कमाल तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचू शकते. 50 किमी प्रतितास वेगाने धुळीचे वादळ देखील येऊ शकते. रिमझिम पावसापासून दिलासा अपेक्षित आहे.

- Advertisement -

मार्च हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना

हवामान खात्यानुसार, या वर्षीचा मार्च हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. या कालावधीत 71% कमी पाऊस झाला. गव्हाच्या उत्पादनात 35% पर्यंत घट झाली.

CBSE: 10-12वी बोर्डाच्या परीक्षांची दुसरी फेरी

CBSE ने सर्व बोर्ड परीक्षा केंद्रांना कडक उष्मा आणि कोविडची वाढती प्रकरणे पाहता उष्णतेची लाट आणि संसर्ग रोखण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. 10-12वीच्या बोर्ड परीक्षेची दुसरी फेरी 26 एप्रिलपासून सुरू झाली. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज म्हणाले, कोविडपासून बचाव करण्यासाठी बोर्डाने परीक्षा केंद्रांना प्रतिदिन 5000 रुपये आणि प्रति उमेदवार 5 रुपये दिले आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी दोन रुपये

पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून दोन रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती भारद्वाज यांनी दिली. एका वर्गात 18 पर्यंत विद्यार्थी असावेत. याशिवाय बाधित विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग व्यवस्था असेल.


हेही वाचाः Bhavana Gawali : भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स, चौकशीला न आल्यास ED कारवाई करणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -