घरदेश-विदेशWeather Update : दिल्लीतील तापमानात घट, तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा वाढला, जाणून...

Weather Update : दिल्लीतील तापमानात घट, तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा वाढला, जाणून घ्या इतर राज्यातील हवामान स्थिती

Subscribe

राजधानी दिल्लीत फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसात हवामानाच्या स्थितीत दिवसेंदिवस बदल होत आहेत, कधी कडक ऊन तर कधी सोसाट्याचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी दिल्लीत थंडीच्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे दिल्लीच्या तापमानात घट झाली आहे. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून 23-24 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होत आहे. जे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा दोन अंशानी कमी आहे त्याचवेळी किमान तापमान जवळपास सामान्य राहिले आहे.

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, 27 फेब्रुवारी रोजी दिल्लीत कमाल तापमान 25 डिग्री सेल्सियस असेल तर किमान तापमान 12 डिग्री सेल्सियस असेल. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होईल. 2 मार्चपर्यंत पुन्हा एकदा दिल्लीचे कमाल तापमान 28 अंशांवर पोहोचू शकते.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्रातही तापमान चढ उतार होत आहे. दिवसाभर कडाक उन्हाळा तर सकाळ आणि रात्री बोचरी थंडी असा अनुभव नागरिकांना येत आहे. यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र पुढील काही दिवसांनी तापमानाचा वारा वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तर उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब अशा अनेक राज्यामध्येही तापमानात चढ उतार होत आहे. आजपासून उत्तर प्रदेशात हवामान पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ असेल.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -