घरदेश-विदेश'अशा' मेसेजवर करु नका क्लिक, नाहीतर व्हॉट्सअॅप होईल हॅक

‘अशा’ मेसेजवर करु नका क्लिक, नाहीतर व्हॉट्सअॅप होईल हॅक

Subscribe

कोलकाता पोलिसांनी ट्विटरवर लोकांना सावध केले आहे.

व्हॉट्सअॅपवर अनेक जण फसवणुकीला बळी पडत आहेत. अशातच कोलकाता पोलिसांनी एका प्रकरणावरून युजर्संना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन ठग व्हॉट्सअॅप क्लोन करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याच्या मदतीने सिम स्वॅपिंग होऊ शकते.

कोलकाता पोलिसांनी ट्विटरवर लोकांना सावध केले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नका. असे पोलिसांनी सांगितलेय. यासोबतच लोकांनी व्हॉट्सअॅपच्या सिक्युरिटी फीचरचाही वापर करावा. असे म्हटले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी ट्विटरवर लिहिले की, ‘तुम्हाला व्हॉट्सअॅपवर असे मेसेज येऊ शकतात, ज्यात लिंकवर क्लिक करा आणि व्हेरिफिकेशन कोड शेअर करा. असे सांगितले जाते. हा मेसेज तुमच्या जवळच्या लोकांचा नावे आलेला असू शकतो. या लिंक्सवर क्लिक केल्यास फसवणूक करणाऱ्यांना तुमच्या व्हॉट्सअॅपवर एक्सेस मिळेल.

पोलिसांनी असे म्हटले आहे की, जर तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडूनही असे मेसेज आले तर पाठवणारा तुम्हाला ओळखतो की नाही हे एकदा तपासा. काही एथिकल हॅकर्सकडून अशा बनावट व्हॉट्सअॅप आणि केवायसी अपडेटशी संबंधित मेसेज आले होते, ज्याची माहिती काही युजर्सनी पोलिसांना दिली आहे.

- Advertisement -

रिपोर्ट्सनुसार, असा स्कॅम सामान्य मेसेजसारखे देखील असू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला फक्त हॅलोचा मेसेज येतो. यापूर्वी कोलकाता पोलिसांनीही फेसबुकवर लोकांना अशा धोक्याची सूचना दिली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा फसवणूक करणारे तुमच्या मित्राच्या नावाने डायरेक्ट मेसेज पाठवून लोकांना फसवू शकतात. सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप मेसेजबाबत जितकी काळजी घेतो तितकीच काळजी तुम्ही एखाद्या अनोळखी फेसबुक मेसेजबाबत घ्या.


मसाल्यातही महागाईची मिरची झोंबणार! लाल मिरचीच्या पिकावर किटकांचा हल्ला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -