घरदेश-विदेशराम मंदिर वादात मध्यस्थी: कोण आहेत जस्टिस इब्राहिम कलीफुल्ला

राम मंदिर वादात मध्यस्थी: कोण आहेत जस्टिस इब्राहिम कलीफुल्ला

Subscribe

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश इब्राहिम कलीफुल्ला हे राम जन्मभूमी – बाबरी मस्जिद विवादात मध्यस्थाची भूमिका बजावणार आहेत. कलीफुल्ला यांची नियुक्ती केल्यानंतर ते कोण आहेत हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. जस्टीस कलीफुल्ला यांनी २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. आपल्या अनेक निर्णयांसाठी त्यांचे नाव आजही घेतले जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) कारभार पारदर्शक करण्यासाठी जस्टीस लोढा यांच्यासोबत मिळून त्यांनी बरंच काम केले होते.

जस्टीस कलीफुल्ला यांचा जन्म २३ जुलै १९५१ मध्ये तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात झाला होता. त्यांचे पुर्ण नाव फकीर मोहम्मद इब्राहिम कलीफुल्ला असे आहे. त्यांनी २० ऑगस्ट १९७५ रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. कामगार कायद्याशी निगडीत प्रकरणांशी त्यांचा जवळचा संबंध आला आणि या क्षेत्रात ते सक्रीय होते. त्यांनी अनेक सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांचे प्रतिनिधीत्व केलेले आहे.

- Advertisement -

हे वाचा – अयोध्या प्रकरण : श्री श्री रविशंकर यांच्या नावावरून वाद

जस्टीस कलीफुल्ला यांनी तामिळनाडूच्या राज्य विद्युत बोर्डाचे वकील म्हणूनही काम पाहीले आहे. राम मंदिराचा विवाद सोडविण्यासाठी तीन मध्यस्थांची समिती नेमली गेली त्यात कलीफुल्ला हे एक सदस्य आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -