घरदेश-विदेशUAE च्या मदतीशिवाय, केरळसाठी ७०० कोटींची मदत जमा

UAE च्या मदतीशिवाय, केरळसाठी ७०० कोटींची मदत जमा

Subscribe

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार ही ७१३.९२ कोटींची संपूर्ण मदत, केवळ दोन आठवड्यात (१४ दिवसांत) जमा झाली आहे.

एकीकडे केरळ आणि केंद्र सरकार UAE कडून येणाऱ्या मदतीवर चर्चा करत असताना, त्याआधीच अन्य स्त्रोतांकडून जमा झालेल्या मदत निधीची किंमतच ७०० कोटी रुपयांच्या जवळपास पोहचली आहे. काही दिवसांपूर्वीच UAE (संयुक्त अरब अमिरातीने) कडून केरळवासीयांना ७०० कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांनी दिली होती. मात्र, युएईकडून याविषयी कोणचीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे युएई ७०० कोटींची मदत करणार की नाही यावर केरळ आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरु होती. ज्याचं रुपांतर कालांतराने वादामध्ये झालं होतं. मात्र, एकीकडे हा वाद सुरु असतानाच, युएई मदत करण्यापूर्वीच केरळच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये ७०० कोटी रुपये जमा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. विशेष म्हणजे केवळ ‘लोकनिधी’च्या माध्यमातूनच ही एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनुसार केरळच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये (CMDRF) सध्या ७१३.९२ कोटी रुपये जमा आहेत.

हेही वाचा : केरळ पूर – मदतीच्या ७०० कोटींचा घोळ!

दरम्यान या एकूण रकमेपैकी ५१८.४२ कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या SBI अकाउंटमध्ये जमा झाले आहेत. तर १३२.६२ कोटी रुपये UPIs द्वारे उपलब्ध झाले आहेत. तसंच ४३ कोटी रुपये PayTM ट्रान्सफरद्वारे मिळाले असून, बाकीचे २० कोटी रुपये कॅश, चेक आणि डिमांड ड्राफ्ट्सच्या माध्यमातून जमा झाले आहेत. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या
इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार ही ७१३.९२ कोटींची संपूर्ण मदत केवळ दोन आठवड्यात (१४ दिवसांत) जमा झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : केरळ पूरग्रस्तांना मदत करा, न्यायमूर्तींची आरोपींना शिक्षा!

काही दिवस सलग सुरु राहिलेल्या जोरदार पावसामुळे केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या महप्रलयात लाखो लोकांचा कष्ट करून उभा केलेला संसार डोळ्यादेखत उद्धवस्त झाला. तरीही केरळवासीय या संकटात ताठ मानेने उभे आहेत, जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. दरम्यान केरळच्या मदतीसाठी शभरातून लोक आपल्याला जमेल तशी आणि तितकी मदत पोहचवत आहेत. यामध्ये अनेक वैयक्तिक मदतींपासून, सामाजिक संस्था, भारतीय लष्कर, बॉलीवूड सेलिब्रीटी आदींच्या मदतीचा खूप मोठा वाटा आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -