घरदेश-विदेशनाव बदलण्यासाठी लाच म्हणून तिने चक्क म्हैस दिली!

नाव बदलण्यासाठी लाच म्हणून तिने चक्क म्हैस दिली!

Subscribe

वडिलोपार्जित संपत्तीसाठी नावात बदल करण्यासाठी तेथील संबंधित अधिकाऱ्याने रामकलीकडे लाचेची मागणी केली होती. 

लाच म्हणून सर्वसाधारणपणे पैसे, जमिनीचा तुकडा, दाग-दागिने आणि तत्सम स्वरुपाचे धन देण्यात येते. पण मध्यप्रदेशमधील एका महिलेने रखडलेले सरकारी काम मार्गी लावण्यासाठी चक्क तिची म्हैसच लाच म्हणून देऊ केली. ही घटना घडली आहे मध्यप्रदेशमध्ये. येथील सीधी जिल्ह्यात रामकली पटेल राहते. वडिलोपार्जित संपत्तीसाठी नावात बदल करण्यासाठी तेथील संबंधित अधिकाऱ्याने तिच्याकडे लाचेची मागणी केली होती.

रामकलीला तिच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नावात बदल करायचा होता. पण त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तिच्याकडे १० हजार रुपये एवढी लाच मागितली. एवढी रक्कम देऊनही संबंधित अधिकाऱ्याने रामकलीकडे आणखी रक्कमेची मागणी केली. एवढी रक्कम तिने त्या अधिकाऱ्याला दिल्यानंतर तिच्याकडे आणखी रक्कमेची मागणी करण्यात आली. पण लाच देण्यासाठी पैसे नसून त्याऐवजी म्हशीचा स्वीकार करावा, असे तिने त्या अधिकाऱ्याला सांगितले. रामकलीच्या या पावित्र्याने तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली.

- Advertisement -

दरम्यान तहसीलदार मायकल टिर्की यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, रामकलीने लाच देण्यासाठी म्हैस आणली होती. पण रामकलीचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून तिला या आदेशाची एक प्रतसुद्धा देण्यात आली आहे. तर सब डिव्हीजन मॅजिस्ट्रेट आर.के.सिन्हा यांनी या प्रकाराला षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी कोणीतरी रामकलीला भडकावल्याचे देखील म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -