घरदेश-विदेशवेशांतर करून महिलेनं अयप्पाचं घेतलं दर्शन

वेशांतर करून महिलेनं अयप्पाचं घेतलं दर्शन

Subscribe

स. पी. मंजू या ३६ वर्षिय महिलेनं वेषांतर करून अयप्पाचं दर्शन घेतलं आहे. भक्तांचा विरोध कायम असल्यानं महिलेनं अखेर वेषांतर करून अयप्पाचं दर्शन घेतलं आहे.

शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. भक्तांनी शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश करता येणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यावरून सध्या मोठ्या प्रमाणावर वाद देखील सुरू आहे. दरम्यान, एस. पी. मंजू या ३६ वर्षिय महिलेनं वेषांतर करून अयप्पाचं दर्शन घेतलं आहे. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना दर्शन घेण्यास बंदी होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र महिलांना प्रवेश द्या असा निर्णय दिला. पण, भक्तांनी मात्र महिलांच्या प्रवेशबंदीला विरोध कायम ठेवला आहे. आत्तापर्यंत मंदिरामध्ये प्रेवश करण्याचे आणि अयप्पाचं दर्शन घेण्याचे प्रयत्न अनेक महिलांकडून झाले. पण, त्यामध्ये त्यांना यश आलेलं  नाही. अखेर एस. पी. मंजू या ३६ वर्षिय महिलेनं वेषांतर करून अयप्पाचं दर्शन घेतलं आहे.

वाचा – शबरीमाला मंदिर: श्रीलंकेच्या महिलेने केला मंदिर प्रवेश

न्यायालयाचा निर्णय आणि भक्त आक्रमक

शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश करू देण्यात यावा तसेच त्यांना अयप्पाचं दर्शन देखील देण्यात यावं असा निर्णय न्यायालयानं दिला. त्यावरून भक्तांनी विरोध दर्शवत आंदोलनं देखील केली. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. अनेकवेळा पोलीस आणि भक्तांमध्ये बाचाबाची देखील झाली. भक्तांच्या या भूमिकेविरोधात पुन्हा एकदा न्यायालयामध्ये धाव घेतली गेली. पण, भक्तांनी मात्र मागे येण्यास ठाम नकार दिला आहे. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला देखील विरोध दर्शवला आहे. त्यानंतर, महिलांनी मंदिरामध्ये केलेला प्रवेशाचे प्रयत्न देखील फसले. अखेर,  एस. पी. मंजू या ३६ वर्षिय महिलेनं वेषांतर करून अयप्पाचं दर्शन घेतलं असा दावा केला आहे.

वाचा – शबरीमाला मंदिर प्रवेश वाद; २५० अटकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -