घरदेश-विदेश'त्या' तरुणीची दु:खद कहाणी...

‘त्या’ तरुणीची दु:खद कहाणी…

Subscribe

सख्या वडिलांनी दोन वेळा तरुणीला विकले. २८ वर्षाच्या वयात तरुणीने सात बालकांना जन्म दिला.

मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात एका २८ वर्षीय तरुणीला तिच्या वडिलांनी दोन वेळा विकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही तरुणी सध्या मंदसौर येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या वन स्टेप सेंटरमध्ये तात्पूर्ती निवासास आहे. या तरुणीने आतापर्यंत सात बालकांना जन्म दिला आहे. विकत घेतलेल्या प्रत्येकाने या तरुणीचे शारिरीक आणि मानसिक शोषण केले. तिला मारहाण केली आणि घरातून काढून दिले. ही घटना मंदसौर येथील जिल्हा रुग्नालयात उघड झाली आहे. परंतु, तरुणीने आपल्या वडिलांच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल केली नसून तिला मारहाण करणाऱ्यांविषयी काहीही पोलिसांना सांगितलेले नाही, त्यामुळे पोलिसांना याप्रकरणी कुठल्याही प्रकारची कारवाई करता आलेली नाही. महिलेने तक्रार केली तर पोलिस नक्कीच कारवाई करतील असे मंदसौरचे पोलीस अधिकारी मनोज कुमार सिंह म्हणाले आहेत. सध्या ही महिला मंदसौर येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या वन स्टेप सेंटरमध्ये तात्पूर्ती निवासास आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अनामिका जैन तिला आपल्या गावी घरी घेऊन जाणार असल्याचे अनामिका स्वत: म्हटले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

मध्य प्रदेशमध्ये एका तरुणीला तिच्या वडिलांनी ती ११ वर्षांची असताना फक्त पाच हजार रुपयांमध्ये विकले होते. तिचे वडील नेहमी दारुच्या नशेत राहत. तिच्या या वडिलांनी महिदपूरच्या नाहरसिंह नावाच्या गृहस्थाला अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये विकले होते. तिथे ती आठ वर्ष राहिली. दरम्यान, तिने तीन मुलींना जन्म दिला. सलग तीन वेळा मुलगी झाल्यामुळे नाहरसिंहला संताप आला. मुलगा न झाल्यामुळे त्याने तिला मारहाण करत घरातून हाकलून दिले आणि तीन मुलींना आपल्याजवळ ठेऊन घेतले.

- Advertisement -

यानंतर ती तरुणी पुन्हा आपल्या वडिलांकडे वास्तव्यास आली. ती तीन वर्षे आपल्या वडिलांकडे राहिली. त्यानंतर तिच्या वडिलांनी पुन्हा तिला देवासचा रहिवाशी राकेश थापा या व्यक्तीला विकून टाकले. त्यावेळी या तरुणीचे वय २१ वर्षे इतके झाले होते. राकेश सोबत संसार करताना तिने आणखी दोन मुलांना जन्म दिला. परंतु, दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे राकेशही तिला मारहाण करायला सुरुवात केली. तिचा छळ करायला लागला. त्यानंतर ती तिथूनही निघून गेली.

यानंतर तरुणीला तिचा लांबचा नातेवाईक देवेंद्र लग्नाचे आमिष दाखवून शाजापूरला घेऊन जातो. तिथे त्याच्यासोबत राहून तरुणीने एका मुलाला जन्म दिला. जेव्हा ती पुन्हा गरोदर झाली. तेव्हा देवेंद्रने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. या गोष्टीला तरुणीने विरोध केला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पुन्हा तिला घरातून बाहेर काढण्यात आले. तरुणीला आजूबाजूच्या ओळखीच्या महिलांनी एका सरकारी रुग्नालयात नेले. तेथून तिला जिल्हा रुग्नालयात पाठवले गेले. तिथे तिने एका मुलाला जन्म दिला. तिला रुग्नालयात घेऊन येणाऱ्या महिला देखील तिची विक्री करण्याचा विचार करत होते. ही बाब जेव्हा रुग्नालयात तरुणीच्या शेजारच्या पलंगावर बसलेल्या एका महिलेला समजली तेव्हा तिने रुग्नालय प्रशासनाजवळ तक्रार दिली. त्यांनतर पोलिसांच्या मार्फत संपूर्ण प्रकार समोर आला. यानंतर दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्या अनामिका जैन रुग्नालयात आल्या. त्यांनी या तरुणीला आपल्या घरी गावाला घेऊन जाण्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

विकृतीमुळे सरकारच्या सक्षमीकरणाचा फज्जा

देशात महिला सक्षमीकरणावर बऱ्याच चर्चा केल्या जातात. महिला सुरक्षित राहावी, तिला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सरकारने भरपूर योजना सुरु केल्या. त्यांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे माध्यमे सुरु केली. परंतु, सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या या सर्व योजना आणि सुविधा कितपत तळागळातील महिलांपर्यंत पोहोचतात हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यामध्ये सरकारचाही काही दोष म्हणता येणार नाही. येथे दोष आहे त्या अठरा विश्व दारिद्रयाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या विकृतीचा. या विकृतीतून कित्येक महिलांचे लैंगिक, शारिरीक आणि मानसिक शोषण केले जाते. परंतू, या घटनांमधून एक बाब सिद्ध होते की विकृतीमुळे सरकारच्या स्त्री सक्षमीकरणाच्या योजनांचा फज्जा उडाला आहे.


हेही वाचा – अश्लील फोटोचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -